Khelo India : महाराष्ट्राच्या इशा-पार्थ जोडीचा सुवर्ण वेध; नेमबाजीच्या मिश्र दुहेरीत हरियाणाचा धुव्वा

Khelo India Youth Games 2024
Khelo India Youth Games 2024 esakal
Updated on

Khelo India Youth Games 2024  : चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये नेमबाजीच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारतीय नेमबाजांनी सुवर्ण वेध घेतला. इशा टाकसाळे व पार्थ माने जोडीने लौकिकास साजेशी कामागिरी करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत मिश्र दुहेरीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.

या दोघांनी गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत हरियणा संघाचा 16-6 गुणांनी धुव्वा उडवला. अंतिम लढतीत हरियाणा संघाच्या दिशा धनकर आणि अर्षित अरोरा यांनी सुरुवातीला 6-4 अशी आघाडी घेतली होती. 6 व्या फेरीत इशा-पार्थ यांनी सहा वेळा 2 गुणांची कामाई करताना विजय सकाराला.

Khelo India Youth Games 2024
WTC Final 2027 : रोहित शर्माच्या मागणीला केराची टोपली; इंग्लंडमध्ये सलग चौथ्यांदा होणार WTC Final?

इशा आणि पार्थ या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये दमदार कामागिरी केली आहे. या दोघांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर यांच्या मुंबईतील लक्ष्य अकॅडमीत सराव करतात.

अमरावतीमध्ये सहाव्या वर्षापासून खेळाचा श्री गणेशा करणाऱ्या इशाने 4 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून युवा स्पर्धेत तिने विक्रमाची नोंद केली आहे. इशाने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडियात पदकाचा करिश्मा घडविला. पार्थने प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेलो इंडियातील यश उर्जा देणारे असल्याचे ईशाने सांगितले.

Khelo India Youth Games 2024
Shoaib Malik Match Fixing : शोएब मलिकचा BPL चा करार मॅच फिक्सिंगमुळं झाला रद्द..? पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो...

पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय क्रीडा विभाग कक्ष अधिकारी रणसिंह डेरे, पथक प्रमुख विजय संतान, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, संजय शेलार, जागतिक विजेते नवनाथ फरताडे, विश्वजीत शिंदे, संदीप तरटे, अजित पाटील, नेहा साप्तेसह दोन्ही खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()