खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व

महाराष्ट्राच्या खेळाडूंचे खेलो इंडिया यूथ गेम्समधील वर्चस्व रविवारीही कायम राहिले.
Khelo India Youth Games Maharashtra leading
Khelo India Youth Games Maharashtra leading
Updated on

पंचकुला : महाराष्ट्राच्या खेळाडूंचे खेलो इंडिया यूथ गेम्समधील वर्चस्व रविवारीही कायम राहिले. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ४ सुवर्णांसह एकूण १७ पदकांवर मोहोर उमटवली. यामध्ये चार रौप्य व चार ब्राँझ पदकांचाही समावेश आहे. हरयाना ६ सुवर्ण पदकांसह (एकूण २४ पदके) प्रथम; तर मणिपूर ४ सुवर्ण पदकांसह (एकूण ५) तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.(Khelo India Youth Games)

वेटलिफ्टिंग या खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मुकुंद अहेरने ५५ किलो वजनी गटात, हर्षदा गरुडने ४५ किलो वजनी गटात व काजोल सरगरने ४० किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. सायकलिंग टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे हिने सुवर्णपदक जिंकले.

योगामध्ये सुवर्णपंचमी

योगासन या प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्णपदके पटकावली.

पारंपरिक योगा प्रकारात सुमित भंडारे (संगमनेर) याने आर्टिस्टिकमध्ये (मुली) वैदेही मयेकर व युगांका राजम यांनी, आर्टिस्टिकमध्ये (मुले) आर्यन खरात व निबोध पाटील (सुवर्ण) यांनी, रिदमिक योगामध्ये (मुले) नानक अभंग व अंश मयेकर यांनी व मुलींच्या गटात स्वरा गुजर व गीता शिंदे यांनी सुवर्ण पदकांवर हक्क सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.