Kho-Kho World Cup : खो-खो विश्‍वकरंडकाला पुन्हा धुमारे ; महाराष्ट्र संघटनेच्या सभेत आयोजकांना विश्‍वास, निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय खो-खो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विश्‍वास व्यक्त करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खो-खो विश्‍वकरंडकाचे धुमारे फुटू लागले आहे.
Kho-Kho World Cup
Kho-Kho World Cupsakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय खो-खो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विश्‍वास व्यक्त करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खो-खो विश्‍वकरंडकाचे धुमारे फुटू लागले आहे. या वर्षअखेरीस खो-खो खेळाची प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेची निवडणूक बिनविरोध पार पडली.

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या सभेला भारतीय खो-खो संघटनेचे महासचिव एम. एस. त्यागी यांची उपस्थिती होती. या सभेत त्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, खो-खो हा खेळ ४९ देशांमध्ये खेळला जात आहे. तसेच ३७ देशांमध्ये राष्ट्रीय संघटनाही स्थापन झाली आहे. या वर्षअखेरीस खो-खो विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येईल. दरम्यान, ही स्पर्धा नवी दिल्ली किंवा लंडन येथे खेळवण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

Kho-Kho World Cup
Indian Men's Hockey : भारतीय हॉकी संघाचा पुन्हा पराभव ; ऑस्ट्रेलियाकडून ४-२ने मात,मालिकेत २-०ची आघाडी

२०२४ ते २०२८ कालावधीसाठी निवडणूक

२०२४ ते २०२८ या कालावधीकरिता निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विविध पदांकरिता कोणाचाही जादा अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, सभागृह, बालेवाडी पुणे येथे पार पाडलेली निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी ॲड. धीरज सोपानराव कोल्हे यांनी जाहीर केले. या निवडणुकीत भारतीय खो-खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदूरचे नितीन कोठारी उपस्थित होते. या सभेला उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो-खो संघटना) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना) यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले.

संजीवराजे अध्यक्षपदी

अध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर यांची पुन्हा निवड झाली. कार्याध्यक्षपदी पुण्याचे सचिन गोडबोले निवडून आले. सरचिटणीसपदासाठी डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदारपदासाठी ॲड. गोविंद शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेची नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष : संजीवराजे नाईक- निंबाळकर (सातारा). उपाध्यक्ष (४ जागा) : १. डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), २. अनिकेत तटकरे (रायगड), ३. महेश गादेकर (सोलापूर), ४. अशोक पितळे (अहमदनगर). कार्याध्यक्ष : सचिन गोडबोले (पुणे). सरचिटणीस : डॉ. चंद्रजीत जाधव (धाराशिव). संयुक्त चिटणीस (५ जागा) : १. डॉ. राजेश सोनवणे (नंदूरबार), २. डॉ. पवन पाटील (परभणी), ३. जयांशू पोळ (जळगाव), ४. बाळासाहेब (बाळ) तोरसकर (मुंबई), ५. वर्षा कच्छवा (बीड). खजिनदार : ॲड. गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.