Kieron Pollard: 'फक्त मी मुंबईचाच...'; पोलार्डने निवृत्तीचे शेअर केली भावनिक पोस्ट

Kieron Pollard
Kieron Pollardesakal
Updated on

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 मध्ये संघातील सर्वात अनुभवी खेळाडू कायरन पोलार्ड याला वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने स्वतःच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. दरम्यान, राजकीय वर्तुळात पोलार्डच्या या मोठ्या निर्णयामागे कोणती कारणं असू शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. (Kieron Pollard IPL 2023 retirement reasons mumbai indians )

विशेष म्हणजे निवृत्ती घेताना पोलार्डने सोशल मीडियावर भली मोठी भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्येच त्यांनी निवृत्ती का घेतली? याचे उत्तर स्पष्ट केले आहे.

मुंबई इंडियन्सने स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला रिलीज केलं आहे. पोलार्ड २०१० सालापासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता. पण आयपीएल २०२२ स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात पोलार्डला अपयश आलं आहे. एकंदरित गतवर्षी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, पोलार्डने निवृत्ती जाहिर केली.

त्याच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सने रिलीज केल्याने पोलार्डने आयपीएलमध्ये सन्यास घेतला अशी चर्चा रंगू लागली. मात्र, कारण काही वेगळेच आहे.

काय आहे कारण?

पोलार्ड २०१० सालापासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता. त्याचे संघासी एक भावनिक नाळ जोडली गेली आहे. याची प्रचिती त्याची भावनिक पोस्ट पाहता येते. त्याने त्याच्या पोस्टमध्ये संघ आणि त्याच्यामधील नाते किती घट्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती, परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या फ्रँचायझीसोबतचा प्रवास अविश्वसनीय होता आणि मी बरंच काही साध्य केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध मी खेळू शकत नाही. अशी मोठी भावना त्याने व्यक्त केली आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघासोबत १३ वर्ष खेळायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. पण, आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून २०११ व २०१३ ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले. असे सांगत त्याने आठवणींना उजाळा दिला.

क्रिकेट तज्ज्ञाचे मत काय?

पोलार्ड सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्याची बॅट शांत झाली आहे. त्याच्या याच निराशजनक कामगिरीमुळं आयपीएल 2022 च्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते.

तसेच, पोलार्ड अलीकडेच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळला होता जिथे या खेळाडूने 14.66 च्या सरासरीने केवळ 132 धावा केल्या. पोलार्डचा स्ट्राईक रेट फक्त 98.50 होता. त्याच्या या खराब कामगिरीमुळं त्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

पोलार्डने नुकतीच T20 आंतरराष्ट्रीय मधूनही निवृत्ती जाहीर केली होती. लार्ड गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकात फ्लॉप ठरला होता. त्याला 107 च्या स्ट्राईक रेटने फक्त 90 धावा करता आल्या.

गेल्या आयपीएल हंगामात पोलार्डने 11 सामन्यात 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी १४.४० होती. या खेळाडूचा स्ट्राईक रेट फक्त 107 होता. पोलार्डचा आयपीएल रेकॉर्ड अप्रतिम असला तरी. या खेळाडूने 171 डावात 28 पेक्षा जास्त सरासरीने 3412 धावा केल्या. तसेच त्याचा स्ट्राईक रेट 147 पेक्षा जास्त होता. पोलार्डनेही 69 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.