MI Cape Town Captain News : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने नुकताच नव्या कर्णधाराची घोषणा केली होती. रोहित शर्माच्या जागी संघाची जबाबदारी हार्दिक पांड्याडकडे सोपवली.
मुंबई इंडियन्स संघ केवळ आयपीएलमध्येच नाही तर परदेशी लीगमध्येही खेळतो. त्या संघांची नावे आयपीएलशी मिळतीजुळती आहेत. यापैकी एका संघाचे नाव MI Capetown आहे जो दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीग SA20 मध्ये खेळतो. एमआयने या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
एमआय केपटाऊनचा कर्णधार राशिद खान दुखापतीमुळे आगामी SA20 हंगामातून बाहेर पडला आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेतून तो बरा होत आहे. अनुभवी लेगस्पिनरला 6 जानेवारी रोजी भारतात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात स्थान देण्यात आले होते, परंतु त्याच्या क्रिकेट बोर्डाने (ACB) दिलेल्या निवेदनानुसार तो खेळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत एमआय केपटाऊनने आगामी हंगामासाठी रशीदच्या जागी किरॉन पोलार्डला संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
किरॉन पोलार्ड SA20 लीगच्या पहिल्या सत्रात संघाचा भाग नव्हता, त्यामुळे हा त्याचा पदार्पण हंगाम देखील असेल. अशा परिस्थितीत निकोलस पूरन आयएलटी 20 लीगमध्ये किरॉन पोलार्डच्या जागी एमआय एमिरेट्सचा कर्णधार असेल. तथापि, UAE मध्ये ILT20 च्या शेवटच्या टप्प्यासाठी पोलार्ड एमआय एमिरेट्समध्ये सामील होईल की नाही हे पाहणे बाकी आहे.
किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. संघानेही त्याला प्रत्येक वेळी कायम ठेवले होते. पण जेव्हा आयपीएल 2023 ची रिलीज लिस्ट समोर आली तेव्हा त्याला सोडण्यात आल्याचे समोर आले, पण तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सशी बॅटिंग कोच म्हणून जोडला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.