Kieron Pollard चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची मोठी घोषणा

Kieron Pollard Retirement from International
Kieron Pollard Retirement from Internationalesakal
Updated on
Summary

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.

Kieron Pollard Retirement from International : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू (West Indies Player) आणि मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. वेस्ट इंडिजचा सुपरस्टार किरॉन पोलार्ड 15 वर्षे वेस्ट इंडिजकडून खेळला असून पोलार्ड सध्या भारतात आहे, जिथं तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करत आहे.

पोलार्डनं 123 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 2706 धावा केल्या आणि 55 बळी घेतलेत. पोलार्ड जगातील सर्वोत्तम T20 फलंदाजांपैकी एक होता. पोलार्डनं 101 सामन्यात 135.14 च्या स्ट्राईक रेटनं 1568 धावा केल्या आहेत. पोलार्डनं फेब्रुवारी 2022 मध्ये भारताविरुध्द शेवटचा सामना खेळला, त्यात त्यानं ODI आणि T20 मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं.

Kieron Pollard Retirement from International
Pakistan Cricket Board : रमीझ राजांची अध्यक्ष पदाची खुर्ची धोक्यात!

पोलार्ड म्हणाला, 'खूप विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. इतर युवा खेळाडूंप्रमाणं वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं आणि तेव्हा मी १० वर्षांचा होतो. वेस्ट इंडिज क्रिकेटची १५ वर्षांहून अधिककाळ सेवा करू शकलो याचा मला अभिमान आहे. माझ्या या निर्णयानं युवा खेळाडूंसाठी एक जागा रिक्त झाली आहे. मी नेहमीच विंडीज संघाला मदत करणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()