किममुळे स्तनपान करणाऱ्या बाळांसाठी उघडला ऑलिम्पिकचा दरवाजा

जगातील सर्वोच्च खेळ संस्थेने कॅनडाची बास्केट बॉल खेळाडू किम गौचर हिच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतला.
Kim Gaucher
Kim GaucherSocial Media
Updated on

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ने टोकियोमध्ये सहभागी होणाऱ्या सुपर मॉमसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्या महिला खेळाडूंची बाळ स्तनपान करते, अशांना बाळाला घेऊन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने यासाठी परवानगी दिलीये. जगातील सर्वोच्च खेळ संस्थेने कॅनडाची बास्केट बॉल खेळाडू किम गौचर हिच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतला. किमने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. (kim-gaucher-other-nursing-mothers-will-be-able-to-bring-children-to-olympics-say-tokyo-organizers)

ब्रिटीश कोलंबियाच्या मिसन येथे वास्तव्यास असणाऱ्या 37 वर्षीय गौचरने सोशल मीडियाच्या माध्यमातून IOC च्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंशिवाय अन्य कोणालाही टोकियोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले होते. या निर्णयामुळे बास्केट बॉलपटू किमला आपल्या दूध पिणाऱ्या मुलीशिवाय ऑलिम्पिक खेळण्याचा किंवा स्पर्धेतून माघार घेण्याचा पर्याय उरला होता. यापूर्वी तिने ऑलिम्पिक समितीला विनंती केली त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. कठोर निर्बंधातून कोणत्याही परिस्थितीत सूट मिळणार नाही, असे आयोजकांकडून सांगण्यात आले होते.

Kim Gaucher
ENGvsIND सामन्यासह इंग्लंड महिला संघाने मालिकाही घातली खिशात
Kim Gaucher
आता अभिमन्यू जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर

आयओसी (IOC) ने आपल्या निवेदनात म्हटलंय की, मातृत्वानंतरही अनेक खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत. उच्च स्तरावर खेळण्यास त्या सक्षम आहेत. टोकियोमध्ये पार पडणाऱ्या स्पर्धेसाठी स्तनपान करणाऱ्या बाळाला सोबत नेण्यासाठी आयोजन समितीने विशेष परवानगी दिलीये, असे स्पष्ट केले आहे.

आयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही खेळाडूला कुटुंबियांसह किंवा अन्य रिलेटिव्हसोबत स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असा निर्बंध घातला होता. बाळासोबत घरीच थांबायचे की ऑलिम्पिक खेळायचे यापैकी एक पर्याय निवडण्याची परिस्थितीन निर्माण झाली होती. अखेर तिला निर्बंधातून दिलासा मिळाला असून आता ती बाळासह ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया आणि प्रायोजक प्रवास करु शकतात. जपानमधील नागरिकांनाही स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आलीये, असा उल्लेख करत आगामी स्पर्धेत मला दूध पित्या मुलीपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागणार आहे, अशी भावनिक पोस्ट किमने लिहिली होती. अखेर तिच्या या पोस्टवर विचार झाला असून तिच्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या इतर महिलांनाही या नियमाचा लाभ होईल.

किम गौचर सध्या फ्लोरिडामध्ये प्रॅक्टिस करत आहे. पतीने तिला ऑलिम्पिक आयोजन समितीचा निर्णय सांगितला. त्यानंतर तिने प्रतिक्रियाही दिलीय. हा निर्णय आनंददायी असून यासाठी मदत करणाऱ्या सर्वांची आभारी आहे, असे किमने इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातू म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.