दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उमेश चव्हाण (कोल्हापूर) विरुद्ध सुदेश ठाकूर (सांगली) यांच्यात झाली. त्यात उमेश चव्हाणने विजेतेपद मिळवले.
वाळवा : येथील गांधी तालीम मंडळाच्या वतीने (Gandhi Talim Mandal) झालेल्या कुस्ती मैदानात (Wrestling Competition) सातारच्या किरण भगत (Kiran Bhagat) याने हरियाणा (Haryana) केसरी सोनू गुलिया (Sonu Gulia) याला केवळ दीड मिनिटांत झोळी डावावर अस्मान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. त्याला एक लाख रुपये आणि तुकाराम धोंडी अहिर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानाची चांदीची गदा देण्यात आली.
जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने गांधी तालीम मंडळाने हे मैदान आयोजित केले होते. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उमेश चव्हाण (कोल्हापूर) विरुद्ध सुदेश ठाकूर (सांगली) यांच्यात झाली. त्यात उमेश चव्हाणने विजेतेपद मिळवले. तृतीय क्रमाकाची कुस्ती सांगलीच्या सागर काळेभाग याने अजित पाटीलवर चितपट खेळी करत जिंकली.
मैदानात लहान-मोठ्या १४० चटकदार कुस्त्या झाल्या. महिला कुस्तीपटू वैष्णवी सावंत (काळमवाडी) मृणाल पाटील यांची लढत रंगतदार झाली. रणजित गावडे, विशाल गावडे, धीरज पवार यांनी खेळाचे नेत्रदीपक प्रदर्शन केले. सरपंच संदेश कांबळे यांच्या वतीने सोपान कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेली ढाल वाळव्याचा मल्ल अक्षय अनुसे याने जिंकली.
नागठाणेचे महान महाराष्ट्र केसरी विजय पाटील, सुहास माने, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, माजी उपसरपंच पोपट अहिर, अभिजित नायकवडी, सुरेश जाधव, नजरुद्दीन नायकवडी, कुस्ती संघटक राहुल मोरे उपस्थित होते. कुस्ती निवेदक ईश्वरा पाटील यांनी समालोचन केले. मैदान पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, बैठकीसाठी खास गॅलरी उभारण्यात आली होती.
गांधी तालीम मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष कुंतिनाथ होरे, रामचंद्र पाटील, सुरेश होरे, सुभाष मोटे, जनार्दन नायकवडी, विजय लाड, विठ्ठल पाटील, दिलीप डकरे, विलास साळुंखे, विकास एडके यांनी संयोजन केले. यावेळी वाळवा, पलूस, इस्लामपूर परिसरातील कुस्तीशौकीन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.