'धोनीच विकेटकीपर हवा; गांगुलीला समजावण्यासाठी लागले 10 दिवस'

'धोनीच विकेटकीपर हवा; गांगुलीला समजावण्यासाठी लागले 10 दिवस'
Updated on

धोनी भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. मेहनत आणि सातत्याच्या बळावर धोनीनं जगात आपलं नाव निर्माण केलं आहे. यष्टीमागील चपळता आणि तुफानी फलंदाजीच्या बळावर धोनीनं क्रिकेटवर राज्य केलं आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की, धोनीच्या निवडीचं श्रेय किरण मोरे यांना जातं. किरण मोरे यांनी धोनीला संधी देत भारताला सर्वउत्कृष्ट यष्टीरक्षक दिला. नुकतेच किरण मोरे यांनी धोनीबद्दलचा एक किस्सा सांगितला.

'कर्टली एण्ड करिश्‍मा शो' या कार्यक्रमात धोनीच्या निवडीबद्दल बोलताना किरण मोरे म्हणाले की, 2003 विश्वचषकानंतर भारतीय निवडसमिती राहुल द्रविडचा पर्याय शोधत होते. निवड समिती असा यष्टीरक्षक शोधत होती, जो वेगानं फलंदाजी करेल अन् फिनिशरची चांगली भूमिका पार पाडेल.

'धोनीच विकेटकीपर हवा; गांगुलीला समजावण्यासाठी लागले 10 दिवस'
धोनी, कोहली, डिव्हिलियर्स वापरतात ती बॅट बनते कशी?

'2003 मध्ये आम्ही यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात होतो. त्यावेळी क्रिकेटचे प्रारुप बदलत होतं. टी-20 क्रिकेटनं नुकतेच आगमन केलं होतं. आम्हाला वेगानं फलंदाजी करणारा आणि जबाबदारीनं फिनिशींग करणाऱ्या खेळाडूची गरज होती. तो सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन झटपट 40 ते 50 धावा काडू शकेल, अशा यष्टीरक्षक फलंदाजाची गरज होती. राहुल द्रविडने यष्टीरक्षक म्हणून 75 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये 2003 चा विश्वचषकही सामाविष्ट होता. विश्वचषकानंतर आम्ही नवीन यष्टीरक्षकाच्या शोधात होतो, असं मोरे म्हणाले.'

'धोनीच विकेटकीपर हवा; गांगुलीला समजावण्यासाठी लागले 10 दिवस'
'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

दीप दासगुप्ता याच्या जागी धोनीला संधी द्यायला हवी.... हे कर्णधार सौरव गांगुलीला पटवून देण्यासाठी दहा दिवस लागले. धोनीला संधी देण्यासाठी गांगुलीसोबत दहा दिवस चर्चा करत होतो, असं मोरे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. स्थानिक स्पर्धेमध्ये धोनीला खेळताना मोरे यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी संघाच्या 170 धावांपैकी धोनीनं 130 धावा चोपल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.