Kiran Navgire : शेतात ट्रॅक्टर चालवणारी किरण क्रिकेटमध्ये इंग्लंड गाजवणार, सकाळ सोबत केली खास बातचीत

मूळची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून असलेली किरण नवगिरे हिला "महिला क्रिकेट मधील धोनी" या नावाने देखील ओळखले जाते.
Kiran Navgire
Kiran Navgiresakal
Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यासाठी भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघाची निवड केली. टी-20 संघामध्ये किरण नवगिरे या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 150 धावा करणारी एकमेव खेळाडू असलेली महाराष्ट्राची किरण नवगिरे ची पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहे. 27 वर्षीय किरण नवगिरे ही तिच्या तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. मूळची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून असलेली किरण नवगिरे हिला "महिला क्रिकेट मधील धोनी" या नावाने देखील ओळखले जाते.

Kiran Navgire
VIDEO: सचिन सोबत डिनर की धोनीसोबत ट्रेनिंग? ऋतुराजच्या उत्तराने जिंकले मन

शेतकरी कुटुंबातून आलेली किरण हिला महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळता आलं नाही म्हणून तिने थेट नागालँड गाठलं. भाला फेक, शॉर्ट पट या खेळात उत्तम कामगिरी केल्यानंतर किरणने क्रिकेट मध्ये आपली किमया दाखवली. नुकत्याच झालेल्या महिला चॅलेंज सिरीज मध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली या नंतर तिचे नाव इंग्लंड दौऱ्यासाठी निश्चित झालं आहे. यानिमित्त तिच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी.

प्रश्न: इंग्लंड दौऱ्यावर निवड झाल्यानंतर काय भावना आहे?

किरण : खूप खुश आहे मी. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे आणि जबाबदारी पण आहे. आता इंग्लंड मध्ये जाऊन मोठी खेळी करायचे स्वप्न आहे

प्रश्न : भारतीय संघात निवड झाल्यानंतर काय वाटलं?

किरण : निवड झाल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. खूप कमी लोकांना भारतीय संघात खेळण्यासाठी संधी मिळते. आता इंग्लंड मध्ये जाऊन टॅलेंट दाखवून द्यायचे आहे. माझ्यासाठी इंग्लंड दौरा हा खूप महत्त्वाचा आहे. मी जर चांगला खेळ खेळत गेली तर भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यायचे माझे स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होईल.

Kiran Navgire
17 वर्षाच्या प्रज्ञानंदाने 6 महिन्यांत तिसऱ्यांदा जगज्जेत्या कार्लसनला नमवलं

प्रश्न : 76 चेंडूत 162 धावा म्हणजेच टी-20 क्रिकेटमध्ये 150 धावा करणारी जगातील पहिली खेळाडू तू आहेस. या रेकॉर्ड बद्दल काय सांगशील?

किरण : 2022 मध्ये, महिला टी-20 ट्रॉफीमध्ये मी नागालँडच्या संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध इतक्या धावा केल्या पण मला नव्हत माहीत की हा रेकॉर्ड झाला आहे. मी माझा नसर्गिक खेळ केला आणि त्यानंतर मला माझ्या कोच ने सांगितले की हा रेकॉर्ड झाला आहे.

प्रश्न : गावात मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव कसा होता?

किरण : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या मिरे गावात मी क्रिकेट खेळायला चालू केलं. माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. मी गावात असताना मला नाईलाजाने मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागायचे. तेव्हा गावाकडच्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असायचा. गावाकडच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. मुलगी मुलांबरोबर खेळते म्हणाल्यावर मला बरेच लोकं ओरडायचे. त्यानंतर मी शेतात जाऊन प्रॅक्टिस करायचे. 2 एकर शेती आहेत आमची आणि मला 2 भाऊ आहेत. त्यावेळी क्रिकेट बरोबर मी ट्रॅक्टर चालवायची आणि ते देखील मी एन्जॉय केलं.

Kiran Navgire
Suzuki Access 125 वर अनुष्का सोबत विराट कोहली रस्त्यावर, जाणून घ्या स्कूटरची किंमत

प्रश्न : भाला फेक आणि athletics खेळल्यानंतर क्रिकेट कडे कशी वळालीस?

किरण : मी भाला फेक आणि athletics मध्ये अनेक टुर्नामेंट खेळल्या आहेत. पण 2011 च्या महेंद्र सिंग धोनी यांनी मारलेल्या षटकारानंतर माझे क्रिकेट विषयी प्रेम खूप जास्त वाढले आणि मला ही बॉल ग्राउंड बाहेर मारायचा असं म्हणत मी क्रिकेट खेळायचे ठरवले.

प्रश्न : किरण नवगिरेचा रोल मॉडेल कोण?

किरण : एम एस धोनीला मी माझं रोल मॉडेल मानते. मी लहानपणापासून मी त्यांना क्रिकेट खेळताना पाहते आहे. 2011 वर्ल्ड कप नंतर मी त्यांचा खेळ फॉलो करायला लागले. त्यांना भेटणे हे देखील माझं स्वप्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.