कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) हेड कोच ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) इंग्लंडच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षक (England Test Team coach) पदासाठीचा सर्वात आघाडीवरचा उमेदवार आहे. याबाबतची माहिती बीबीसी या ब्रिटीश वृत्तसंस्थेने दिली आहे. ब्रॅडन मॅक्युलनच्या नावाची घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर संघाचा काळजीवाहक म्हणून पॉल कॉलिंगवूडकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कसोटी संघासाठी वेगळा आणि मर्यादित षटकांच्या संघासाठी वेगळा प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षाच्या मॅक्युलम इंग्लंडचा प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुक आहे. मॅक्युलम सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक आहे. मॅक्युलमने न्यूझीलंडकडून (New Zealand) 101 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 54 चेंडूत शतक ठोकले होते. कसोटीत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दित 6,453 कसोटी धावा केल्या आहेत. त्यात 12 शतके आणि 31 अर्धशतकाचा समावेश आहे.
इंग्लंडने गेल्या महिन्यातच नवा कसोटी कर्णधार म्हणून न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या बेन स्टोक्सची (Ben Stokes) नियुक्ती केली होती. त्याने पाच वर्षे कसोटी कर्णधारपद सांभाळलेल्या जो रूटकडून नेतृत्वाची धुरा आपल्या हातात घेतली आहे. इंग्लंड जूनमध्ये न्यूझीलंडबरोबर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.