KKR IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सची मोठी घोषणा! दुखापती अय्यरच्या जागी हा दिग्गज खेळाडू होणार कर्णधार

KKR IPL 2023 Nitish Rana to captain KKR in place of injured Shreyas Iyer cricket news in marathi
KKR IPL 2023 Nitish Rana to captain KKR in place of injured Shreyas Iyer cricket news in marathi sakal
Updated on

IPL 2023 Nitish Rana to captain KKR : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा या मोसमात संघाचे नेतृत्व करणार आहे. राणा जखमी श्रेयस अय्यरची जागा घेणार आहे. कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस पाठीच्या खालच्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही.

KKR IPL 2023 Nitish Rana to captain KKR in place of injured Shreyas Iyer cricket news in marathi
Virat Kohli: ''दारू पिल्यानंतर मी कुणालाच ऐकत नव्हतो...''पत्नी अनुष्कासमोर विराटचा मोठा खुलासा

कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, श्रेयस अय्यर लवकरच बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. नितीश यांच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे हे आमचे भाग्य आहे. तो व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आपल्या राज्याचे नेतृत्व करत आहे आणि 2018 पासून कोलकाता नाइट रायडर्ससोबत आहे. तो चांगलं काम करेल.

KKR IPL 2023 Nitish Rana to captain KKR in place of injured Shreyas Iyer cricket news in marathi
Indore Pitch Controversy : झुकेगा नहीं साला! इंदूरच्या खेळपट्टी वादात बीसीसीआयने ICCला आणलं गुडघ्यावर

फ्रँचायझीने पुढे म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि सपोर्ट स्टाफच्या नेतृत्वाखाली त्याला मैदानाबाहेर सर्व आवश्यक सहकार्य मिळेल आणि संघातील अनुभवी खेळाडूंचाही त्याला पाठिंबा असेल. आम्ही त्याला त्याच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देतो आणि श्रेयसला पूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

आयपीएलचा 16वा सीझन 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोलायचे तर ते 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.