मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीने सांगितला कोरोनाचा भयावह अनुभव!

मिस्ट्री स्पिनर कोरोनातून सावरला असला तरी तो अद्याप सराव करण्यासाठी फिट नाही.
varun chakraborty
varun chakraborty File Photo
Updated on

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (varun chakraborty) कोरोनातून (Covid 19) सावरलाय. आयपीएल स्पर्धेदरम्यान कोरोनाची लागण झालेला तो पहिला खेळाडू होता. त्याच्यापाठोपाठ इतर संघातील खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करण्यात आली होती. मिस्ट्री स्पिनर कोरोनातून सावरला असला तरी तो अद्याप सराव करण्यासाठी फिट नाही. चक्रवर्ती 11 मेलाच कोरोनातून सावरला. चेन्नईस्थित आपल्या घरामध्ये तो फिटनेसवर भर देत आहे. एका मुलाखतीमध्ये वरुण चक्रवर्तीने कोरोना डिटेक्ट झाल्यापासून ते सावरल्यानंतर आताच्या परिस्थितीवर भाष्य केले. (KKR Mystery Spinner varun chakraborty worried said i still feel weakness)

कोरोनातून सावरल्यानंतरही जाणवतोय थकवा

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुण चक्रवर्ती म्हणाला की, कोविडनंतर अजूनही त्रास जाणवतोय. थकवा असल्यामुळे सराव करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. खोकला किंवा ताप नसला तरी अशक्तपणा जाणवतोय. कोरोनाचा अनुभव भयावह असून यातून सावरल्यानंतर पुन्हा मैदानात उतरण्यापूर्वी कमीत कमी दोन आठवड्यांची विश्रांती घ्यायला पाहिजे, असा सल्ला त्याने आपल्या सवंगड्यांना दिलाय. त्याचा हा सल्ला कोरोनातून सावरणाऱ्या खेळाडूंसोबतच या भयावह व्हायरसचा सामना केलेल्या सर्वांसाठीच मोलाचा असा आहे.

varun chakraborty
WTC : शास्त्री गुरुजींनी 3 गोष्टींवर आखलाय गेम प्लॅन

मास्क वापरा आणि मानसिकता कणखर ठेवा

कोविड 19 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सर्व काही ठिक झाले असे नाही. त्यानंतर किमान दोन आठवडे विश्रांतीची गरज असते. रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून मास्कशिवाय फिरु नये. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करायलाच पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना मानसिक कणखर राहायला पाहिजे, असेही त्याने म्हटले आहे.

कोलकाताच्या ताफ्यात असताना काय काय घडले

1 मे रोजी मला अस्वस्थ वाटत होते. खोकला नव्हता पण हलका ताप होता. त्यामुळे मी सराव सत्रात भाग घेतला नाही. या सर्व गोष्टीची माहिती तात्काल संघ व्यवस्थापनाला दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत आरटी पीसीआर चाचणी केली. या सर्व घटनेनंतर मी कोलकाता टीमच्या इतर सहाकाऱ्यांपासून लगेच वेगळा झाला होतो, त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळले, असेही त्याने सांगितले.

varun chakraborty
WTC : अश्विनला विश्वविक्रमाची संधी!

बायो-बबलमधून बाहेर आल्यामुळे कोरोना?

आयपीएल स्पर्धेदरम्यान कोलकाताकडून खेळणारा वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे बायोबबलमधून बाहेर आला होता. स्कॅनसाठी तो बाहेर आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. बीसीसीआयने तो नियमानुसारच बाहेर पडल्याचे म्हटले होते. यावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.