Asia Cup 2023 : ...जर असं झालं तर केएल राहुल, श्रेयस अय्यर यांची वर्ल्डकप संघातून गच्छंती नक्की?

Asia Cup 2023
Asia Cup 2023esakal
Updated on

Asia Cup 2023 : केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे आशिया कपमध्ये खेळणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे या दोघेही भारतात होणरा वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही हे याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आपला फिटेनस परत मिळवण्यासाठी घाम गाळत आहेत.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार केएल राहुल हा फिट झाला असून आशिया कपमध्ये खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मात्र श्रेयस अय्यरबाबत अजूनही शाश्वती देता येत नाहीये. त्याने पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे मात्र त्याला अजूनही पाठीत स्टिफनेस जाणवत आहे.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 : रवी शास्त्रीसह 'या' भारतीय दिग्गज खेळाडूंची आशिया कपमध्ये एंट्री!

केएल राहुलच्या संघातील समावेशामुळे संघाचा समतोल हा सुधारणार आहे. तो विकेटकिपर आणि फलंदाज अशा दोन्ही भुमिका पार पाडणार आहे. श्रेयस अय्यर हा भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने गेल्या वर्षी वनडेमध्ये या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली होती.

मात्र जर हे दोन्ही खेळाडू आशिया कप खेळण्यात असमर्थ राहिले तर भारतीय संघाचा समतोल पुन्हा बिघडू शकतो. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पोकळी निर्माण होईल. यामुळे रोहित आणि विराट कोहलीनंतर आश्वासक फलंदाज राहणार नाही. जर राहुल, श्रेयस यांच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव ही दोन नावे वर्ल्डकपसाठी आघाडीवर आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार अजित आगरकर वेस्ट इंडीजमधून भारतात परतला आहे. तो उर्वरित निवडसमिती सदस्यांसोबत बैठक घेणार आहे. जर श्रेयस अय्यर आशिया कपसाठी मुकला तर सूर्यकुमार यादव आणि सॅमसन यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी चुरत असेल. इशान किशन हा विकेटकिपर म्हणून बॅकअप प्लॅन असेल त्याने विंडीज दौऱ्यावरील वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली आहे.

Asia Cup 2023
MS Dhoni : धोनी विसरला चक्क घरचा रस्ता... येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे विचारला रांचीचा मार्ग, Viral Video

इशान किशन हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाही. तो सलामीला येतो. त्याचे चौथ्या क्रमांकावरील रेकॉर्ड देखील फारसे चांगले नाही. त्याने 6 सामन्यात 22.75 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. म्हणूनच भारतीय संघ केएल राहुल लवकरात लवकर फिट व्हावा अशी प्रार्थना कररत आहे. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत 45 च्या सरसरीने धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव वनडेमध्ये आपल्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर संजू सॅमसन हा एकमेव पर्याय आहे. मात्र सॅमसनचे देखील कामगिरीत सातत्य नाही. वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ थोडेच वनडे सामने खेळणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.