Asia Cup 2022 : बीसीसीआयने UAE मध्ये 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप T20 साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे, मात्र जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे स्पर्धेबाहेर आहेत. केएल राहुल आयपीएल 2022 नंतर एकही सामना खेळू शकला नाही. यापूर्वी दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मालिकेत खेळेल अशी अपेक्षा होती, मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो मैदानात उतरू शकला नाही. आता त्याला पुन्हा एकदा T20 आशिया कप 2022 साठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.
आशिया कप स्पर्धेचे सामने 27 ऑगस्टपासून UAE मध्ये होणार आहेत. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान गट फेरीत एकमेकांशी भिडणार आहे. बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, केएल राहुलची आशिया कपसाठी निवड झाली पण प्रोटोकॉलनुसार त्याची बंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस चाचणी होणार आहे. पुढील आठवड्यात त्याची फिटनेस चाचणी होऊ शकते. तो चाचणीत अपयशी ठरल्यास, स्टँडबाय म्हणून समाविष्ट केलेला श्रेयस अय्यर यूएईला जाईल.
सलामीवीर फलंदाज केएल राहुलची टी-20 मधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आयपीएल 2022 मध्ये 616 धावा केल्या होत्या. मात्र त्याचा संघ लखनौ सुपर जायंट्स अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. या दिग्गज फलंदाजाचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 56 सामन्यात 41 च्या सरासरीने 1831 धावा केल्या आहेत. तसेच 2 शतके आणि 16 अर्धशतकेही केली आहेत. यंदा राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने सलामीवीर म्हणून 8 खेळाडूंना आजमावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.