लखनौच्या विजयानंतर केएल राहुलने एक्स्ट्रा पैशाची मागणी का केली?

लखनौच्या विजयानंतर केएल राहुलने केली एक्स्ट्रा पैशांची मागणी.
KL Rahul
KL Rahulesakal
Updated on

आयपीएलचा 15 सीझन सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशातच फॉर्मात असणारा नवा संघ लखनौने काल कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत शानदार विजय मिळवला. लखनौने केकेआरचा केवळ 2 धावांनी पराभव केला. या मॅचनंतर केएल राहुलने केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. त्याने अधिक पैशांची मागणी केली आहे.

लखनौच्या विजयानंतर दोन स्थानांसाठी पाच संघामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहेत.

KL Rahul
शतक ठोकणाऱ्या डीकॉकने आक्रमक जल्लोष का केला?

दरम्यान केकेआरविरुद्ध लखनौच्या विजयानंतर राहुल म्हणाला, मला असं वाटतं की या अशा मॅचसाठी अधिक पैसे मिळायला हवेत. या मोसमात आम्ही असे सामने गमावले आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले बरेच सामने झालेले नाहीत. आम्ही हा सामना जिंकू शकलो याचा आनंद आहे. आम्ही हा सामना गमावू शकलो असतो आणि नंतर आम्ही खराब क्रिकेट खेळल्याप्रमाणे मैदानातून परतलो असतो.

KL Rahul
केकेआरच्या पराभवानंतर गंभीरचे धडाकेबाज सेलिब्रेशन : पाहा व्हिडिओ

लीगच्या अखेरची मॅच अशाप्रकारे जिंकणे संघासाठी चांगले आहे. दोन्ही संघाला समांतर क्रेडिट जाते कारण केकेआरच्या संघानेदेखील चांगली कामगिरी केली. शेवटच्या दोन चेंडूवर तीन धावा शिल्लक होत्या. आम्ही उत्कृष्ट फलंदाजी केली. लुइसचा तो कॅच चांगला होता. तसेच मोहसिन खानने आमच्यासाठी काही सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे. ज्याप्रकारे तो खेळत आहे. त्याची खेळी पाहता तो लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दिसेल. अशी भविष्यवाणीही मोहसिन खानबद्दल राहुलने यावेळी केली.

लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. डी कॉकशिवाय कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात कोलकाता संघ 8 विकेट्सवर 208 धावाच करू शकला आणि सामना 2 धावांनी हरला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.