KL Rahul Wicket Keeping In Test Cricket : भारताचा फलंदाज केएल राहुल यापूर्वी सलामीवीर म्हणून खेळत होता. मात्र आता तो मधल्या फळीत फलंदाजीला येतो. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने मधल्या फळीत फलंदाजी करत दमदार खेळी केल्या. याचबरोबर विकेटकिपर म्हणून देखील त्याची कामगिरी अत्यंत चांगली होती.
आता टी 20 वर्ल्डकप जवळ आला आहे. तेथेही केएल राहुल संघात विकेटकिपर म्हणून आपली दावेदारी सादर करू शकतो. आता केएल राहुलने कसोटीत देखील आपल्याला विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळायला आवडेल असे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अपघातानंतर फिटनेस परत मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत असलेल्या ऋषभ पंतचे धाबे दणाणले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेपूर्वी कर्णधार केएल राहुलने पत्रकार परिषद घेतली. यावेळी तो म्हणाला की, 'मी वनडे मालिकेत विकेटकिपिंग आणि मधल्या फळीत फलंदाजी करणार आहे. जर कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने सांगितले तर कसोटी क्रिकेटमध्ये देखील मला हीच भुमिका निभवायला आवडेल. टी 20 मध्ये देखील मला माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहेच.'
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना उद्या (दि. 17) जोहान्सबर्ग येथे होत आहे.
भारतीय संघला कसोटी क्रिकेटमध्ये चांगला विकेटकिपर मिळालेला नाही. केएल राहुल आणि पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन विकेटकिपिंग करतोय. त्याचा बॅकअप म्हणून केएस भरत संघासोबत असतो. मात्र केएल आता कसोटीतही विकेटकिपिंग करण्यास तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.