KL Rahul Asia Cup 2023 : 'KL राहुलची काही गॅरंटी नाही...', दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने टीम इंडियाची वाढली डोकेदुखी

KL Rahul  Asia Cup 2023
KL Rahul Asia Cup 2023esakal
Updated on

KL Rahul Asia Cup 2023 : पूर्ण तंदुरुस्त नसतानाही भारतीय संघात निवड करण्यात आलेला केएल राहुल आता आशिया कप 2023 मध्ये भारताच्या दुसऱ्या साखळी सामन्यातही खेळू शकणार नाही. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगतले, परंतु एकूणच परिस्थिती पाहता राहुल आशिया कप स्पर्धेस मुकण्याची शक्यता अधिक आहे.

आशिया कप आजपासून सुरू होत असली, तरी भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकविरुद्ध होत आहे आणि दुसरा सामना 4 तारखेला नेपाळविरुद्ध होत आहे. तोपर्यंत तरी राहुलकडे मॅच फिटनेस येणार नाही हे स्पष्ट झाले.

यादरम्यान भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने केएल राहुलच्या फिटनेसबद्दल मोठे वक्तव्य केल्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. आशिया कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमधून केएल राहुल बाहेर पडला आहे आणि मोहम्मद कैफचा विश्वास आहे की दोन सामन्यांनंतरही तो तंदुरुस्त होईल याची गॅरंटी नाही.

KL Rahul  Asia Cup 2023
Asia Cup 2023 : सामना पाकिस्तानात, उत्साह श्रीलंकेत! आजपासून रंगणार आशिया कपचा थरार

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफ म्हणाला की, तो बाहेर आहे याचा अर्थ केएल राहुलची दुखापत वाढू शकते. आता तो अनफिट असेल तर दोन सामन्यांनंतर तो फिट होईलच याची गॅरंटी नाही. भारतीय संघासाठी ही चांगली बातमी नाही कारण राहुल एकदिवसीय सामन्यात संघासाठी पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. त्याचे आकडे खूप चांगले आहेत.

पुढे तो म्हणाला की, मधल्या फळीत फलंदाजी करताना राहुल भारतीय संघाला फिनिशिंग टच देतो. यासोबतच डाव कसा हाताळायचा हेही त्याला माहीत आहे. आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या 17 सदस्यीय भारतीय संघात राहुलचा समावेश करण्यात आला होता.

आयपीएल 2023 दरम्यान राहुलला मांडीला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. राहुलची ती दुखापत बरी झाली पण नवीन दुखापतीमुळे त्याला आशिया कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्याला मुकावे लागले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.