Ind Vs Sa : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग-11 मधून KL राहुलला डच्चू?

कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये करणार बदल
kl rahul
kl rahulsakal
Updated on

T20 World Cup 2022 India Playing-XI : भारतीय संघासमोर आता टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पर्थमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी रणनीती तयार करत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा स्थितीत त्याच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिकवर आहेत. या सामन्यासाठी रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

kl rahul
Ind vs Sa : आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक? उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. त्यानंतर सिडनीमध्ये नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला तर गट टॉपर म्हणून आपले स्थान आणखी मजबूत होईल. त्यामुळे त्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होईल.

kl rahul
MS Dhoni IND Vs RSA : आफ्रिकेविरूद्ध धावांचा पाऊस! धोनीनं पांड्या - पंतला दिली खास टिप्स

भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. रोहितचा सलामीचा जोडीदार केएल राहुल अद्याप चांगल्या लय मध्ये दिसला नाही. तो चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अशा स्थितीत ऋषभ पंतला त्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

रविचंद्रन अश्विनने फिरकीपटू म्हणून संघात चांगली कामगिरी केली आहे. पर्थच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात ऑफस्पिनर सिकंदर रझा याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत फिरकीपटू म्हणून अश्विनचे ​​स्थान पक्के झाल्याचे मानले जात आहे. युझवेंद्र चहलला आता विश्रांती घ्यावी लागणार आहे.

kl rahul
Virat Kohli One8 Commune : विराटनं रेस्तराँ चेन सुरू केली मात्र त्याचा सचिन अन् सेहवाग तर होणार नाही ना?

भारताची संभाव्य प्लेइंग-11 : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.