Asia Cup 2022 KL Rahul : आशिया कपच्या शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर 212 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. शेवटच्या सामन्यात भारताने आपल्या संघात काही बदल केले होते. कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती आणि संघाचे नेतृत्व केएल राहुल करत होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 119 धावांची सलामी दिली. रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला केएल राहुल आणि विराट कोहली आले होते. विराट कोहलीने नाबाद 122 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर केएल राहुलने देखील 62 धावांचे मोठे योगदान दिले. (Virat Kohli Should Open in T20 World Cup)
दरम्यान, सामना जिंकल्यानंतर केएल राहुलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाने केएल राहुल चांगलाच भडकला. केएल राहुलला विचारण्यात आले की, वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीला रोहित शर्माच्या साथीने सलामीला उतरले पाहिजे का? या प्रश्नाचा अर्थ जर विराट कोहली सलामीला आला तर केएल राहुलला बाहेर बसावे लागणार. केएल राहुलने हा प्रश्न ऐकताच एक प्रतिप्रश्न केला. तर मी स्वतः बाहेर बसू का?
राहुलच्या मते 'विराट कोहलीला मोठी खेळी करण्यासाठी सलामीला येण्याची गरज नाही. मात्र ही गोष्ट विसरून चालणार नाही की ज्यावेळी तुमच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज धावा करतो त्यावेळी संघाचे मनोबल वाढते.'
रोहित पुढे म्हणाला की, 'विराट कोहलीने मोठी खेळी करणे हे संघाच्या फायद्याचे असते. ज्या प्रकारे त्याने अफगाणिस्तानविरूद्ध खेळी केली मला वाटते की तो खूप खूष झाला असणार. जर तुम्ही दोन तीन चांगल्या खेळी करता त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो. ज्या प्रकारे विराटने फलंदाजी केली मी खूप खूष आहे. तुम्ही सर्वजण विराट कोहलीला जाणता. तुम्ही त्याला अनेक वर्षापासून खेळताना पाहत आला आहे. त्याने डावाची सुरूवात करतानाच शतक ठोकले आहे असे नाही. जरी त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली तरी तो शतक ठोकू शकतो. ही गोष्ट संघातील रोलशी निगडीत आहे. प्रत्येक खेळाडूची एक भुमिका असते.'
राहुल पुढे म्हणाला की, 'विराट कोहली सेलिब्रेशन करताना दिलासा मिळतो. त्याची मानसिकता, काम करण्याची पद्धत बदलली नव्हती. तो ज्या प्रकारे सामन्यासाठी तयारी करायचा यात कोणताही बदल झालेला नव्हता. त्याने ज्या प्रकारने आज खेळी केली ती पाहून ड्रेसिंगरूममधील कोणाला आश्चर्य वाटले नव्हते. मला पूर्ण विश्वास आहे की या खेळीने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.