KL Rahul Team India : स्लो स्ट्राइक रेटवर केएल राहुलने तोडले मौन, म्हणाला...

सलामी फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न मी करणार ...
kl rahul
kl rahulsakal
Updated on

KL Rahul Team India 2022 : गेल्या काही काळापासून फलंदाजीच्या धावगतीवरून सातत्याने टीकेला सामोरा गेलेला भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार के. एल. राहुल याने सोमवारी अखेर आपण फलंदाजीची धावगती उंचावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 लढतीच्या पूर्वसंध्येला त्याने पत्रकारांशी संवाद साधला.

kl rahul
LLC : जॉन्सनच्या लखनौमधील हॉटेल रूममध्ये सापडला साप, म्हणाला...

राहुल या वेळी म्हणाला, कोणीही परिपूर्ण नसतो. काही ना काही सुधारणा करण्याकडे प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असतो. धावगती उंचावण्यासाठीही काही फलंदाज प्रयत्न करीत असतात. माझाही कल त्याच कडे आहे, असे तो पुढे स्पष्टपणे सांगतो. एका विशिष्ट धावगतीने कोणताही फलंदाज सातत्याने फलंदाजी करू शकत नाही. 100 किंवा 120 च्या धावगतीने फलंदाजी केल्यानंतरही देशाने सामना जिंकला तर त्यामध्ये वावगे ते काय? मात्र अशा बाबींचे प्रत्येक वेळी मूल्यमापण करण्यात येत नाही, अशी खंत पुढे त्याने बोलून दाखवली.

kl rahul
Sean Abbott : ऑस्ट्रेलियाच्या 'या' धडधडत्या तोफेपासून 'सावधान इंडिया'

सलामी फलंदाजाची जबाबदारी

भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या 10 ते 12 महिन्यांमध्ये खेळाडूंना जबाबदारी वाटून दिली आहे. कोणत्या खेळाडूला काय करावयाचे आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. माझ्या खांद्यावरही सलामी फलंदाजीची जबाबदारी आहे. सलामी फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याचसोबत धावगती वाढवण्यावरही लक्ष देणार आहे, असे राहुल विश्वासाने म्हणतो.

कर्णधार, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापनाने भारतीय संघात चांगले वातावरण तयार केले आहे. त्यामुळे खेळाडू अपयशाला घाबरत नाहीत, तसेच चुका झाल्या तरी त्यामध्ये कशा सुधारणा करता येतील, यावर लक्ष दिले जाते.

- के. एल. राहुल, उपकर्णधार, भारत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()