KL Rahul : वनडे क्रिकेटला प्राथमिकता नाही... सामना झाल्यानंतर कर्णधार केएल राहुल स्पष्टच बोलला

KL Rahul
KL Rahulesakal
Updated on

KL Rahul odi Cricket : भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेला 116 धावात रोखले होते. अर्शदीप सिंगने 5 तर आवेश खानने 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने नाबाद अर्धशतक ठोकले. त्याला अय्यरने 52 धावांची साथ दिली.

KL Rahul
WTC Point Table : विजय ऑस्ट्रेलियाचा.. पराभव पाकिस्तानचा... मात्र फायदा झाला भारताचा

दरम्यान, सामना झाल्यानंतर कर्णधार केएल राहुलने आपली प्रतिक्रिया दिली. राहुल म्हणाला, 'विजय मिळवल्याने मी खूष आहे. आम्ही ज्या प्रकारची अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळंच घडलं. आमचा प्लॅन हा फिरकीपटूंवर अवलंबून होता. मात्र वेगवान गोलंदाजांनी खरोखरचं चांगली कामगिरी केली. त्यांनी अत्यंत शिस्तीत मारा केला.'

'चेंडू चांगला स्विंग होत होता. सध्या खूप क्रिकेट खेळलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला एका फॉरमॅटला प्राधान्य द्यावं लागतं. सध्याच्या घडीला वनडे नाही तर टी 20 आणि कसोटी या दोन फॉरमॅटला जास्त प्रधान्य आहे. संघातील सर्व खेळाडू देशासाठी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खळण्याची चांगली संधी मिळाली आहे.'

KL Rahul
KL Rahul : 10 पैकी 10! कर्णधार राहुलने इतिहास रचला; आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

सामन्याचा मानकरी ठरलेल्या अर्शदीप सिंगने देखील आपले मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, 'या क्षणाला मी खूप खूष आहे. देवाचे आणि संघ व्यवस्थापनाचे आभार. हे सामान्य मैदानापेक्षा वेगळं मैदान आहे. इथं लगेच थकायला होतं. सांगायचं झालं तर वैयक्तिकरित्या मला खूप भारी वाटतंय मी माझी संघातील भुमिका एन्जॉय करतोय.

मी केएल राहुल भाईचे आभार मानतो त्याने मला सांगितलं की तुला परत गोलंदाजी करायची आहे अन् त्या पाच विकेट्स घ्यायच्या आहेत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.