KL Rahul Sunil Shetty : केएल राहुलसाठी अखेर सासरेबुवा उतरले मैदानात; आकाश चोप्राच्या ट्विटला...

KL Rahul Sunil Shetty
KL Rahul Sunil Shettyesakal
Updated on

KL Rahul Sunil Shetty : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघात रोहितसोबत कोण सलामी देणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या दोन सामन्यात अनुभवी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सलामी दिली. मात्र केएल राहुलला आपल्या लैकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याच्या जागी फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला खेळवण्यात यावे अशी जोरदार मागणी सुरू झाली आहे.

KL Rahul Sunil Shetty
IND vs AUS: KL राहुल नाही तर हा खेळाडू बनला रोहितसाठी डोकेदुखी! तिसऱ्या कसोटीतून देणार डच्चू

दरम्यान, गिल की केएल या वादात भारताचे दोन माजी खेळाडू एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. व्यंकटेश प्रसादने केएल राहुलला संघातून बाहेर काढत शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली आहे. तर समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्राने केएल राहुलला अजून संधी मिळावी यासाठी त्याची पाठराखण केली.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलला पाठिंबा दर्शवला. त्यांनी राहुलचे परदेशातील रेकॉर्डचा दाखला दिला. यावरून व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात ट्विटरवर वाद रंगला. या दोघांनी एकमेकांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यानच केएल राहुलचे सासरेबुवा सुनिल शेट्टी यांनी उडी घेतली. त्यांनी आकाश चोप्राचे ट्विट लाईक करत अप्रत्यक्षरित्या आपल्या जावयाला पाठीशी घातले.

KL Rahul Sunil Shetty
Venkatesh Prasad : वेंकीनं पाकिस्तानचे दात घातले होते घशात! अजुनही ती इनिंग...

केएल राहुलच्या विदेशातील कामगिरीवर आणि कामगिरीतील सातत्यावर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांनी एका पाठोपाठ एक ट्विट केले.

आकाश चोप्राने 'SENA देशातील कामगिरीमुळे बहुदा कर्णधार निवडसमिती आणि कोच केएल राहुलच्या पाठीशी उभे आहेत. राहुलने मायदेशात फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. मला बीसीसीआयचे कोणतेही पद नको आहे. मला कोणत्याही मेटॉरची गरज नाही. आयपीएलमधील संघाचे कोचपदही नको आहे.' असे ट्विट केले.

या ट्विटला केएल राहुलचे सासरेबुवा बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांनी लाईक केले. एक प्रकारे सासरेबुवांनी केएल राहुलला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दर्शवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.