Asia Cup 2023 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाला मिळाली एक चांगली बातमी मात्र...

Asia Cup 2023
Asia Cup 2023esakal
Updated on

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आशिया कपच्या तोंडावर हा मोठा दिलासा मिळाला आहे. आशिया कप 30 ऑगस्टपासून 17 सप्टेंबर दरम्यान, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यर फिट झाला असून तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे. मात्र श्रेयस अय्यरच्या फिटनेस बाबत अजून काही अपडेट आलेली नाही.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि वेस्ट इंडीज दौऱ्याला देखील मुकला होता. त्याच्या मांडीच्या स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत होता. आता तो आशिया कपसाठी 100 टक्के फिट झाला आहे. (Asia Cup 2023 Team India Squad)

Asia Cup 2023
Video: पदार्पणातच 2 षटकारांसह सुरुवात करणाऱ्या तिलक वर्माला दक्षिण आफ्रिकेतून खास मेसेज

केएल राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर विकेटकिपिंग आणि फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुरूवातीला आलेल्या वृत्तानुसार केएल राहुल आशिया कपपर्यंत फिट होण्याची शक्यता कमी होती. मात्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तो आता पूर्णपणे फिट झाला असून निवडीसाठी उपलब्ध आहे. (KL Rahul Fitness Update)

केएल राहुलच्या संघात परतण्याने वनडे संघाचा समतोल चांगला झाला आहे. तो संघातील प्रथम पसंती असलेला विकेटकिपर आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'बीसीसीआयच्या एनसीएचे प्रशिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञ राहुलच्या प्रगतीवर आणि रिहॅबिलिटेशनवर पूर्णपणे समाधानी आहेत. तो आशिया कप संघ निवडीसाठी उपलब्ध आहे.'

सध्या भारतीय संघात इशान किशनवर विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी दिली होती. मात्र त्याला अपयश आले. राहुलच्या संघात परतल्याने कर्णधार रोहित शर्माला अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवण्याची संधी मिळणार आहे. राहुलने गेल्या वर्षभरात वनडे क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावे केल्या आहेत.

Asia Cup 2023
Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी कर्णधाराचा राजीनामा, संघाला सोडले वाऱ्यावर

राहुल संघात परतल्यानंतर तो विकेटकिपिंगचा जॉब त्याच्याकडेच जाणार आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यर अजूनही त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याला आयपीएलचा संपूर्ण हंगामाला मुकावे लागले होते. याचबरोबर तो WTC फायनल आणि वेस्ट इंडीज दौऱ्याला देखील मुकला आहे. त्याला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती.

श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी 'आम्हाला खात्री आहे की दोघेही वर्ल्डकपपर्यंत फिट होतील. आशिया कप सुरू होईल त्यावेळी तो फिट झालेला असेल. मात्र आम्हाला घाई करतायची नाही. राहुल तीन आठवड्यात पूर्णपणे बरा होईल. श्रेयसबद्दल अधिक माहिती ही येत्या दोन दिवसात कळेल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.