VIDEO : KL राहुलचा रॉकेट थ्रो; बवुमाला दाखवला तंबूचा रस्ता

KL Rahul vs Temba Bavuma
KL Rahul vs Temba BavumaSakal
Updated on

South Africa vs India, 3rd ODI : केपटाऊनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ऑल आउट करुन दाखवलं. गोलंदाजीतील बदल टीम इंडियाच्या फायद्याचा ठरला. याशिवाय फिल्डिंगमध्येही सर्वोच्च नजराणा पाहायला मिळाला. कर्णधार लोकेश राहुलनं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला डायरेक्ट हीटवर रन आउट केले. ही भारतासाठी मोठी विकेट होती. दुसऱ्या वनडेत बवुमानं शतकी खेळी साकारून टीम इंडियाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला लवकर बाद करण्यात टीम इंडियाला यश आले.

तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत लोकेश राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. दीपक चाहरनं (Deepak Chahar) मलानला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर 34 धावा असताना लोकेश राहुलनं अप्रतिम थ्रोवर टेम्बा बवुमाला (Temba Bavuma) तंबूचा रस्ता दाखवला. बवुमानं 12 चेंडूचा सामना करताना 8 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सातव्या षटकात दीपक चाहर गोलंदाजी करत होता. चाहरचा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं टोलावल्यानंतर बवुमाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. लोकेश राहुलनं क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवत डायरेक्ट थ्रो करत बवुमाचा खेळ खल्लास केला. सोशल मीडियावर लोकेश राहुलच्या फिल्डिंगचे कौतुक होताना दिसत आहे.

KL Rahul vs Temba Bavuma
Syed Modi Badminton Title : नागपूरच्या फुलराणीला नमवत सिंधू बनली चॅम्पियन!

भारतीय संघाने सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघाला धक्के दिले. पण त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रस्सी व्हॅन डर दुसेन जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. क्विंटन डिकॉकनं शतकी खेळी केली. तर दुसऱ्या बाजुला दुसेनं याने अर्धशतकी खेळी करत संघासाठी उपयुक्त धावा केल्या.

KL Rahul vs Temba Bavuma
प्रितीला अलविदा करुन राहुल झाला मालामाल!

या दोघांशिवाय डेविड मिलरने 39 धावांचे योगदान दिले. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटचे षटक पूर्ण होण्याआधीच ऑल आउट झाला. बवुमाच्या विकेटशिवाय श्रेयस अय्यर पंत जोडीनं फेलुकवायोच्या रुपात रन आउच्या रुपात एक विकेट घेतली. भारतीय संघाने रन आउटच्या रुपात दोन गड्यांना स्वस्तात माघारी धाडले. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑल आउट केले आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत मालिका खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.