India Squad WC23: वर्ल्ड संघातून श्रेयस अय्यरचा पत्ता कट, दिग्गज खेळाडूने कोणत्या 15 खेळाडूंना दिली संधी

India Squad WC23: वर्ल्ड संघातून श्रेयस अय्यरचा पत्ता कट, दिग्गज खेळाडूने कोणत्या 15 खेळाडूंना दिली संधी
Updated on

India squad for World Cup 2023 : भारताचा माजी क्रिकेटपटू के श्रीकांतने 2023 च्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपस्पर्धेसाठी आपल्या आवडत्या भारतीय संघाची घोषणा केला आहे. श्रीकांतने धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरचा 15 सदस्यीय संघात समावेश केला नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दुखापतीतून बरा झाल्यानंतर अय्यर नुकताच टीम इंडियात परतला आहे. तो भारताच्या आशिया कप 2023 संघाचा एक भाग आहे. अय्यरने नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे 199 धावा करून निवडकर्त्यांना आपला फिटनेस सिद्ध केला आहे.

India Squad WC23: वर्ल्ड संघातून श्रेयस अय्यरचा पत्ता कट, दिग्गज खेळाडूने कोणत्या 15 खेळाडूंना दिली संधी
KL Rahul Asia Cup 2023 : ... तर केएल राहुल भारतीय संघात दिसलाच नसता; संजय बांगरने केला गौप्यस्फोट

श्रीकांतने कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना संघात सलामीवीर म्हणून ठेवले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर अनुभवी विराट कोहलीला स्थान दिले आहे.

भारतीय संघ अनेक दिवसांपासून चौथ्या क्रमांकाच्या मोठी समस्या आहे. श्रीकांतने संघात केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिले आहे, ज्याच्या फिटनेसवर सध्या प्रश्नचिन्ह आहे. आशिया कप मध्ये काही सामने त्याला मुकण्याची शक्यता आहे.

India Squad WC23: वर्ल्ड संघातून श्रेयस अय्यरचा पत्ता कट, दिग्गज खेळाडूने कोणत्या 15 खेळाडूंना दिली संधी
ODI WC23 : 'भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये विराटला तिसऱ्या क्रमांकावर नाही तर...' कोहलीबद्दल डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

श्रीकांतने निवडलेल्या संघात हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल असे चार अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक आणि शार्दुल हे वेगवान अष्टपैलू आहेत तर जडेजा आणि अक्षर हे फिरकी अष्टपैलू आहेत. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा फिरकीपटू म्हणून समावेश केला आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे वेगवान आक्रमणाचा भाग आहेत.

विशेष म्हणजे श्रीकांतच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 2011 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड केली होती. त्यानंतर 28 वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून भारताने इतिहास रचला होता.

श्रीकांतचा वर्ल्ड कप 2023 साठीचा भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जादुई यादव बुमराह, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.