Virat Kohli SA vs IND : कसोटीत विराट कॅप्टन असतानाच आपण.. माजी खेळाडू रोहित सेनेला का म्हणाले ओव्हररेटेड?

Virat Kohli SA vs IND
Virat Kohli SA vs INDESAKAL
Updated on

Virat Kohli Indian Test Cricket Team : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. यानंतर टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. आता भारताचे माजी खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनी देखील संघाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी तर विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा कसोटी संघ आणि रोहितच्या नेतृत्वाखालील भारताचा कसोटी संघ अशी तुलना केली.

Virat Kohli SA vs IND
Rafael Nadal : टेनिस कोर्टवरील शांतता झाली भंग... अखेर 'बादशाह' 349 दिवसांनी परतला!

श्रीकांत आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले की, 'कसोटी क्रिकेटमध्ये आपला संघ ओव्हररेटेड आहे. मला असं वाटतं की 2 - 3 वर्षाच्या काळात आपण जबदस्त कामगिरी केली. त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. आपण इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेत झुंजार खेळ केला. तर ऑस्ट्रेलियात आपण विजय मिळवला.'

श्रीकांत यांच्या मते भारतीय संघाने आयसीसी रँकिंगवर जास्त भर देतोय. भारतीय संघातील अनेक खेळाडू हे ओव्हरेटेड आहेत.

श्रीकांत म्हणाले की, 'आपल्याला आयसीसी रँकिंग विसरायला हवं. आपल्याकडे एक - दोन क्रमांकाचे आकर्षण आहे. हे ओव्हररेटेड खेळाडू त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करत नाहीत. किंवा संघात असेही खेळाडू आहेत पुरेशी संधीच मिळालेली नाही. जसं की कुलदीप यादव!'

Virat Kohli SA vs IND
Shubman Gill : शुभमन गिल सूर्याच्या वळणावर; कसोटी संघातून होणार बाहेर?

श्रीकांत पुढे म्हणाले की, 'टी 20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ खूप ओव्हरेटेड आहे. वनडे क्रिकेटमध्ये आपला संघ भारी आहे. वनडेमध्ये काय होतं की बाद फेरीत एकच सामना असतो. तिथं नशिबावर सर्व अवलंबून असतं. रोहित शर्मा म्हणाला की, एका क्रिकेटपटूसाठी वनडे वर्ल्डकप जिंकणं ही खूप मोठी कामगिरी असते. आपण बाद फेरीत काही वेळा खराब कामगिरी करतोय. मात्र आपली वनडे संघ दमदार आहे. मग आपण कोठेही खेळू.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.