KRK Tweet On Anushka-Virat Asia Cup : भारतीय संघ आशिया कपमध्ये पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला आणि तेव्हापासून तो मैदानापासून दूर आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. 28 ऑगस्टला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळेल तेव्हा सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड स्टार के.आर.के. त्याने विराट कोहलीवरही भाष्य करत टीम इंडियाच्या स्टारच्या डिप्रेशनवर मत मांडले आहे.
अभिनेता कमाल रशीद कुमार उर्फ केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर इंटरनेटवर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करत असतो. केआरके सिनेमापासून राजकारणापर्यंत आणि देश-विदेशातील मुद्द्यांवर ट्विट करत असतो. यादरम्यान त्याने क्रिकेटर विराट कोहलीच्या डिप्रेशनवर आपले मत मांडले आहे. केआरकेने विराटच्या डिप्रेशनसाठी अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे.
केआरकेने त्याच्या ट्विटरवर विराट कोहलीचे एक कोट पोस्टर केला आहे. यासोबतच त्याने ट्विटमध्ये विराटच्या डिप्रेशनसाठी अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटर आहे, जो डिप्रेशनशी झुंज देत आहे. एका हिरोईनशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे.
केआरकेचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या ट्विटमुळे बहुतांश सोशल मीडिया यूजर्स केआरकेला ट्रोल करत आहेत. केआरकेला अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवल्यामुळे ट्रोल केले आहे.
विराटने आपले अखेरचे शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात झळकावले होते. गेल्या पाच सामन्यांत त्याची 20 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. मानसिकृदष्ट्या अतिशय सक्षम असा मी होतो, पण प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात आणि त्याची जाणीव होणे महत्त्वाचे असते; अन्यथा पुढचा प्रवास अवघड होत जातो. सध्याच्या या काळाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत, असे विराटने सांगितले. विराट पाकिस्तानविरुद्ध 100 वा ट्वेन्टी-20 सामना खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.