केएसए चषक : प्रॅक्‍टीस क्‍लब (अ) विरूद्ध दिलबहार सामना बरोबरीत 

KSA Football Competition Practice Club Vs Dilbahar Mathch Tie
KSA Football Competition Practice Club Vs Dilbahar Mathch Tie
Updated on

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज प्रॅक्‍टीस क्‍लब (अ) विरूद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) संघातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. दुपारच्या सत्रात पीटीएम (ब) विरूद्ध उत्तरेश्‍वर प्रासादिक संघातील सामनाही 2-2 असा बरोबरीत राहिला. शाहू स्टेडीयमवर या स्पर्धा सुरू आहेत. 

साखळी स्पर्धेला सुरवात झाल्यापासून प्रॅक्‍टीस क्‍लब संघाने धडाका लावल्याने आजच्या सामन्याचा निकाल काय लागतो याकडे लक्ष लागून राहिले होते. पुर्वार्धात "प्रॅक्‍टीस'च्या ओंकार मोरे याने मोठ्या गोलक्षेत्राबाहेरून जोरदार फटक्‍याद्वारे गोल नोंदवून 1-0 अशी आघाडी घेतली. "दिलबहार'च्या आघाडी फळीतील खेळाडूंनी गोल फेडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, "प्रॅक्‍टीस'च्या बचावफळीने प्रयत्न निष्फळ ठरविले. पुर्वार्धात 1-0 आघाडी कायम राहिली. 

उत्तरार्धातील नवव्या मिनिटाला "दिलबहार'च्या जावेद जमादार याने मैदानी गोल नोंदवून 1-1 अशी बरोबरी साधली. "दिलबहार'च्या चढाईचा ओघ वाढला, ऍबियो, शुभम माळी, राहूल तळेकर, रोमॅरिक यांनी आक्रमणाचा धडाका लावला. "प्रॅक्‍टीस'कडूनही कैलास पाटील, इम्युॅनस, इंद्रजित चौगुले, राहूल पाटील यांनी जोरदार चढाया केल्या. दोन्ही संघाच्या गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्या गोलची नोंद न झाल्याने सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. 

दुपारच्या सत्रात पीटीएम (ब) च्या वैभव देसाई व आशिष घाटगे यांनी गोल नोंदवून 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र, उत्तरार्धात उत्तरेश्‍वर प्रासादिकच्या ओंकार भोपकर, सिद्धेश शिंदे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद करत 2-2 अशी बरोबरी साधली. पूर्ण वेळेत दोन्ही संघांनी चुरशीच्या खेळाचे दर्शन घडविले. हा सामनाही बरोबरीत राहिला. 

बुधवारचे सामने 

ऋणमुक्तेश्‍वर विरूद्ध खंडोबा (ब) 
शिवाजी तरूण मंडळ विरूद्ध खंडोबा तालीम मंडळ (अ) 

संबंधीत बातम्या - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.