Video : कुलदीपच्या फिरकीवर आफ्रिकेचे फलंदाज नाचले, अवघ्या 25 चेंडूत फिरवला सामना

गोलंदाजीदरम्यान कुलदीपने असे काही चेंडू टाकले, ज्याचे उत्तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाकडे नव्हते.
kuldeep yadav
kuldeep yadav
Updated on

Kuldeep Yadav : दिल्लीत खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिस-या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने अप्रतिम कामगिरी करत 18 धावांत चार बळी घेतल्या. कुलदीपच्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 99 धावांत आटोपला. कुलदीपला सामनावीराचा किताब देण्यात आला.

kuldeep yadav
Ind vs SA : लाइव्ह मॅचदरम्यान मैदानात घुसला कुत्रा, झाला मोठा राडा

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केवळ 99 धावा केल्या, 27.1 षटकात संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा संघ 99 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला. यानंतर भारताने हे लक्ष्य 20 व्या षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. गोलंदाजीदरम्यान कुलदीपने असे काही चेंडू टाकले, ज्याचे उत्तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाकडे नव्हते.

विशेषत: ज्या पद्धतीने त्याने एंडिले फेहलुकवायो आणि एनरिक नॉर्टजे यांना गोलंदाजी करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपच्या जादुई फिरकीमुळे दोन्ही फलंदाज बाद झाले. या दोन फलंदाजांशिवाय यान्सेन आणि ब्योर्न फॉर्च्युइनलाही बाद करण्यात कुलदीपला यश आले. यांच्या व्यतिरिक्त शाहबाज अहमदची फिरकीही अप्रतिम होती, शाहबाजने आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले.

kuldeep yadav
T20 World Cup: भारतासाठी आनंदाची बातमी, शमी फिट; लवकरच होणार ऑस्ट्रेलियाला रवाना

भारतासाठी या सामन्यात शुभमन गिल 57 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने आठ चौकार मारले, मात्र त्याचे अर्धशतक हुकले. गिल वनडेतही चांगली कामगिरी करत आहे. मालिका जिंकल्यानंतर शिखर धवनने मुकेश कुमारला ट्रॉफी दिली. या मालिकेत प्रथमच मुकेशची भारतीय संघात निवड झाली. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.