Kylian Mbappe Record : सामन्याच्या 79 व्या मिनिटापर्यंत 2 - 0 ने आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला किलियन एम्बाप्पेने अवघ्या एका मिनिटात जमिनीवर आणले. त्याने 80 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत खात उघडले. अन् पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करत सामना एका मिनिटाच बरोबरीत आणला. याचबरोबर एम्बाप्पेने मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली. तो आता फिफा वर्ल्डकपमध्ये 10 गोल करणारा सर्वात तरूण खेळाडू (23 वर्षे आणि 363 दिवस) ठरला आहे. त्याने गेरड मुलर यांचा (24 वर्षे 226 दिवस) विक्रम मोडला.
दुसऱ्या हाफमध्येही पासिंग आणि बॉल पजेशनच्या बाबतीत अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी केली. तसेच गोलपोस्टवर चढाई करण्यात देखील मेस्सीच्या अर्जेंटिनाने आघाडी घेतली. मात्र सामन्याच्या 79 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ओटामेंडीने फ्रान्सच्या खेळाडूला डी मध्ये अवैधरित्या अडवले. त्यामुळे फ्रान्सला पेनाल्टी मिळाली आणि इथंच सामना फिरला. एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत एम्बाप्पेने दुसरा गोल करत 2 - 2 अशी बरोबरी साधली.
अर्जेंटिनाने सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच गोल करत फ्रान्सला बॅकफूटला ढकलले होते. यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अर्जेंटिनाचा डी मारियाने 36 व्या मिनिटाला अॅलिस्टरच्या सहाय्याने गतविजेत्यांवर दुसरा गोल केला होता. याची परतफेड फ्रान्सने 80 आणि 81 व्या मिनिटाला पाठोपाठ दोन गोल करत केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.