Kylian Mbappe : फ्रान्सला बसला मोठा धक्का; स्टार एम्बाप्पे युरो कपच्या संपूर्ण ग्रुप स्टेजच्या सामन्यांना मुकणार

Euro Cup 2024 : आधीच अवघड ग्रुपमध्ये असलेल्या फ्रान्सला एम्बाप्पेच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसू शकतो.
Kylian Mbappe
Kylian Mbappe Euro Cup 2024esakal

Kylian Mbappe Euro Cup 2024 : युरो कप 2024 मध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पेच्या नाकाला मोठा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो ग्रुप स्टेजमधील उर्वरित सर्व सामन्यांना मुकणार आहे. एम्बाप्पेला फ्रान्सच्या ग्रुप स्टेजमधील पहिल्याच सामन्यात दुखापत झाली. ग्रुप डी मधील ऑस्ट्रियाविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. हा सामना फ्रान्सने 1 - 0 असा जिंकला होता.

Kylian Mbappe
Gautam Gambhir : गंभीर नाही एकटा, दुसऱ्या उमेदवारानं बीसीसीआयला केलं प्रभावित; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट

ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमीलर वॉबेरने सेल्फ गोलं केल्यानं फ्रान्सचं आपल्या ग्रुप स्टेजमधील पहिल्याच सामन्यात गोलचं खातं उघडलं होतं. त्यानंतर फ्रान्सचा कर्णधार एम्बाप्पे हा ऑस्ट्रियन डिफेंडरला धडकला अन् त्याच्या नाकाला दुखापत झाली. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्यानं त्याला मैदान सोडावं लागलं होतं. फ्रान्सने सामना 1 - 0 असा जिंकला मात्र फ्रान्सच्या एकाही फुटबॉलपटूला ऑस्ट्रियाची गोलपोस्ट भेदता आली नाही.

एम्बाप्पेच्या दुखापतीबाबतच्या प्राथमिक अहवालानंतर त्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे आढळून आलं. सुदैवानं त्याला कोणच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाहीये. मात्र एम्बाप्पेला त्याच्या नाकाला पुन्हा इजा होऊ नये म्हणून प्रोटेक्टेड शिल्ड वापरावं लागणार आहे. एम्बाप्पे हा आगामी नेदरलँड्स आणि पोलंडविरूद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

Kylian Mbappe
T20 World Cup 2024 : यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये हे 5 खेळाडू ठरू शकतात 'मालिकावीर'

एम्बाप्पे सामन्याला मुकल्यामुळं फ्रान्सला मोठा धक्का बसला आहे. एम्बाप्पे हा फ्रान्सच्या आक्रमक फळीतील सर्वात चांगला खेळाडू आहे. त्याच्या अनुपस्थितीत फ्रान्ससमोर मोठं आव्हान असणार आहे. आता इतर स्ट्रायकरर्सना आपला खेळ उंचावून फ्रान्सला एम्बाप्पेची उणीव भासू न देण्याची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. फिफा वर्ल्डकप 2022 चे उपविजेते फ्रान्स यंदाच्या युरो कपमध्ये एका अवघड ग्रुपमध्ये आहेत. त्यांना डच आणि पोलिश संघासोबत खेळायचं आहे.

(Football News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com