Kylian Mbappe Real Madrid : लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मनला (PSG) नारळ दिल्यानंतर आता किलियन एम्बाप्पे देखील क्लबला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त आले होते. तो PSG सोबतचा आपला करार पुढे वाढून इच्छित नाही. या घडामोडी घडत असतानाच एम्बाप्पे हा रिअल माद्रिदमध्ये जाऊ शकतो असे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली.
अखेर फ्रेंचमन एम्बाप्पेने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगत आपण पीएसजी सोबत खूष असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे एम्बाप्पेने पीएसजीसोबतचा करार वाढवण्यास नकार दिला आहे. फ्रान्समधील विश्वसनीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एम्बाप्पेने पीएसजीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून तो आपला करार वाढवण्यास इच्छुक नसल्याचे कळवले आहे. एम्बाप्पेचे पीएसजीसोबतचा करार हा 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे. हा करार 2025 पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
पीएसजीने 2024 मध्ये आपला खेळाडू फ्री ट्रान्सफर होण्याचा धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तो या समरमध्ये तो विकला जाऊ शकतो. एम्पाप्पेची रिअल माद्रिदकडून खेळण्याची इच्छा आहे. 14 वेळा युरोपियन चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या क्लबसाठी देखील असा खेळाडू संघात असणे उत्साहवर्धक असणार आहे. त्यामुळेच या घटना या ट्रान्सफरशी जोडून पाहिल्या जात आहेत.
एम्बाप्पेने मात्र माध्यमात आलेल्या रिपोर्ट्सवर नाराजी व्यक्त केली आहे. 2018 च्या वर्ल्डकप विजेत्या फ्रान्सच्या संघातील खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्याने आपण रिअल माद्रिदशी संपर्क केला नसल्याचे सांगितले. या वर्षी त्याला पीएसजीमध्येच रहायचं आहे आणि तो पीएसजीसोबत खूष आहे असं त्यानं सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.