Euro 2024 Final : 'वंडरकिड' यमालमुळे स्पेनला आर्थिक फटका? इंग्लंडविरुद्ध अंतिम लढतीत अल्पवयीन असल्याने जर्मन नियमाचा भंग होणार

Spain vs England Euro 2024 Final : आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील स्पॅनिश वंडरकिड आणि शनिवारी सतरावा वाढदिवस साजरा करणारा लमिन यमाल सध्या चर्चेत आहे.
Lamine Yamal Spain vs England Euro 2024 Final
Lamine Yamal Spain vs England Euro 2024 Finalsakal
Updated on

Spain vs England Euro 2024 Final : आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील स्पॅनिश वंडरकिड आणि शनिवारी सतरावा वाढदिवस साजरा करणारा लमिन यमाल सध्या चर्चेत आहे. युरो करंडकातील बहारदार कामगिरीने त्याने वाहव्वा मिळविलीच, त्याच वेळी तो अल्पवयीन असल्याने रॉयल स्पॅनिश फुटबॉल महासंघाला आर्थिक फटका बसू शकेल.

स्पेनची रविवारी (ता. १४) युरो करंडक अंतिम लढतीत गतउपविजेत्या इंग्लंडशी गाठ पडणार आहे. त्या लढतीत खेळताना यमाल १७ वर्षे व १ दिवसाचा असेल, म्हणजेच जर्मन मजूर कायद्यानुसार हा असामान्य गुणवत्तेचा फुटबॉलपटू अल्पवयीन असेल, त्यामुळे अंतिम लढत नव्वद मिनिटांपुढे गेल्यास खेळू शकणार नाही. जर्मन मजूर कायदा अल्पवयीनांना रात्री आठनंतर काम करण्यास मज्जाव करतो आणि खेळाडू असल्यास या नियमाची मुदत रात्री ११ वाजेपर्यंत असते.

Lamine Yamal Spain vs England Euro 2024 Final
Video: 21 वर्ष, 188 कसोटी अन् 704 विकेट्स! James Anderson ची निवृत्ती, इंग्लंडकडून विजयाची भेट

स्पर्धेचे यजमान असलेल्या जर्मनीतील स्थानिक वेळेनुसार, युरो करंडक अंतिम लढत रविवारी रात्री नऊ वाजता बर्लिन येथे सुरू होईल. १५ मिनिटांच्या विश्रांतीसह सामन्यातील नव्वद मिनिटे रात्री ११ पूर्वी संपणे अपेक्षित आहे. सामन्यातील भरपाई वेळ निर्धारित वेळेत मोजली जाईल; मात्र अंतिम लढत अतिरिक्त वेळेत गेल्यास किंवा पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबल्यास यमालबाबत जर्मन मजूर कायद्याचा भंग होईल. तसे झाल्यास कारवाईअंतर्गत जर्मन सरकार स्पॅनिश फुटबॉल महासंघावर ३० हजार युरोंचा (अंदाजे २७ लाख रुपये) दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार, जर्मन सरकार खिलाडू वृत्तीने कारवाई करण्याची शक्यता कमीच असली, तरी जर्मन मजूर कायद्याचा मात्र निश्चितच भंग होईल.

आतापर्यंत काय घडले?

लमिन यमाल युरो करंडकात स्पेनतर्फे सर्व सहाही विजयी सामने खेळला आहे. सर्व सामन्यांत स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फ्युएन्टे यांनी त्याला स्टार्टिंग लिस्टमध्ये घेतले; परंतु पूर्ण ९० मिनिटांपूर्वी बदलले. कदाचित जर्मन मजूर कायद्याचा हा परिणाम असावा, असेही म्हटले जाते. जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत फ्युएन्टे यांनी लमिनला ९०+४व्या मिनिटास विश्रांती दिली होती. एक गोल व तीन असिस्ट (गोल साह्य) अशी यमालची स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरी आहे.

Lamine Yamal Spain vs England Euro 2024 Final
Wimbledon 2024 मध्ये पुन्हा अल्का'राज'? मेदवेदेवला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा गाठली फायनल

कोण आहे लमिन यमाल?

लमिन यमाल जन्माने स्पॅनिश आहे. १३ जुलै २००७ ही त्याची जन्मतारीख. त्याचे वडील मुनीर नासरावी हे मूळचे मोरोक्को देशातील, तर आई शीला एबाना या इक्वेटोरियल गिनी देशातील. यमालच्या वडिलांचे कुटुंब १९८८ साली स्पेनमध्ये स्थलांतरित झाले. २०१४ ते २०२३ या कालावधी स्पेनमधील प्रसिद्ध बार्सिलोना क्लबच्या युवा प्रक्रियेत राहिल्यानंतर यमालने २०२३ साली या क्लबच्या सीनियर संघातून पदार्पण केले.

विक्रमी फुटबॉलपटू लमिन यमाल

- ८ सप्टेंबर २०२३ रोजी युरो करंडक पात्रता फेरीत जॉर्जियाविरुद्ध १६ वर्षे व ५७ दिवसांचा असताना त्याने आंतरारष्ट्रीय पदार्पण आणि गोलही नोंदविला, दोहोतही कमी वयाचा विक्रमी स्पॅनिश फुटबॉलपटू

- बर्लिन येथे युरो करंडकात क्रोएशियाविरुद्ध पदार्पण केले तेव्हा १६ वर्षे व ३३८ दिवसांचा, त्याच लढतीत एक असिस्ट, स्पर्धेच्या मुख्य फेरीतील सर्वांत युवा फुटबॉलपटू

- फ्रान्सविरुद्ध म्युनिक येथे उपांत्य लढतीत गोल, यावेळी वय १६ वर्षे व ३६२ दिवस, स्पर्धेत गोल करणारा सर्वांत युवा खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.