Lasith Malinga Will be the Sri Lanka Bowling Strategy Coach
Lasith Malinga Will be the Sri Lanka Bowling Strategy CoachEsakal

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'इंडियन पॅटर्न', मलिंगावर मोठी जबाबदारी

Published on

कोलंबो : श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगावर (Lasith Malinga) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) एक मोठी जबाबदारी सोपली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Austrlia Tour) श्रीलंकेच्या संघाचा तो विशेष गोलंदाजी प्रशिक्षक (Bowling Strategy Coach) असणार आहे. याबाबतची घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधावारी केली. श्रीलंका क्रिकेटने याबाबतचे वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात 'मलिंगाला थोड्या अवधीसाठी विशेष प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. तो आता श्रीलंकेच्या गोलंदाजांची मदत करेल. याचबरोबर रणनिती ठरवण्यात देखील सहाय्य करेल.' असे म्हटले आहे.( Lasith Malinga Will be the Sri Lanka Bowling Strategy Coach for Australia Tour)

Lasith Malinga Will be the Sri Lanka Bowling Strategy Coach
आता मोर्चा रिस्ट स्पिनरकडे; कुलदीपचे कमबॅक, बिश्नोईला संधी

या वक्तव्यात श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुढे म्हणते की, 'एसएलसीला विश्वास आहे की मलिंगाचा टी २० क्रिकेटमधील अनुभव संघासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कामी येईल.' श्रीलंका ११ फेब्रुवारीपासून पाच टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका संघाचे (Sri Lanka Cricket Team) अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून रूमेश रत्नायके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाने देखील युएईमध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपसाठी महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्त केले होते. (Sri Lanka vs Australia Series Updates)

Lasith Malinga Will be the Sri Lanka Bowling Strategy Coach
पक्क ठरलंय! रोहितच घेणार विराटची जागा; पण...

लसिथ मलिंगाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात क्रिकेटच्या (Cricket) सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. मलिंगाने २०२० मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने ६ मार्च २०२० मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.