BWF Rankings " जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटनपटूंना रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झालाय. जागतिक बॅडमिंटन संघाच्या नव्या क्रमवारीत श्रीकांत किदांम्बी (Kidambi Srikanth)अव्वल दहामध्ये आला आहे. दोन वर्षानंतर त्याने आघाडीच्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागितक बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतने फायनलपर्यंत मजल मारली होती. पुरुष गटात या स्पर्धेची फायनल खेळणारा श्रीकांत एकमेव भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत श्रीकांतच्या रौप्य पदकाशिवाय 20 वर्षीय लक्ष्य सेन (Lakshya Sen) यानेही कांस्य पदकाची कमाई केली होती.
पुरुष गटात या दोघांशिवाय एच एस प्रणॉयनेही लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याला पदकाने हुलकावणी दिली असली तरी क्वार्टर फायनलपर्यंतच्या प्रवासामुळे त्याला रँकिंगमध्ये फायदा झालाय. महिला गटातून पीव्ही सिंधून क्वार्टरफायनलपर्यंत मजल मारली होती.
भारताच्या या चारही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली आहे. रौप्य पदक विजेत्या श्रीकांतने चार स्थानांनी सुधारणा करत दहाव्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिले पदक पटकावणाऱ्या लक्ष्य सेनने कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग मिळवली आहे. तो सध्या 17 व्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉय सहा स्थानांच्या सुधारणेसह 26 क्रमांकावर पोहचला आहे. भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळांडूमधील बी साई प्रणीत आणि समीर वर्मा यांच्या क्रमावरीत एका स्थानांने घसरण झाली आहे. या दोघांनीही अव्वल 25 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे.
महिला गटातील क्रमवारीत पीव्ही सिंधूच्या रँकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. ती सातव्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या बाजूला सायना नेहवाल 25 स्थानावर आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोन्नप्पा आणि एन सिक्की रेड्डी जोडी एका स्थानांनी सुधारणा करत 20 व्या क्रमांकावर पोहचली आहे.
स्पेनमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये श्रीकांतने रौप्य पदकाची कमाई केली. फायनलमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्याने नवा इतिहास रचला आहे. भारतीयांकडून पुरुष गटातील त्याची ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरलीये. मायदेशी परतल्यानंतर श्रीकांतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने ऑलिम्पिक स्पर्धेला मुकल्याची खंत बोलून दाखवली. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठीचे काही सामने दुखापतीमुळे मुकला. ज्यावेळी फिट झालो त्यावेळी जवळपास 7 स्पर्धा रद्द झाल्या. ही गोष्ट बाजूला ठेवून पुन्हा चांगला खेळ करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले. त्यात यश मिळाले, असे श्रीकांत ऐतिहासिक कामगिरीनंतर म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.