ICC Rankings: यशस्वी जयस्वालची भरारी, शुभमन गिलही ठरला लय भारी; ऋतुराज गायकवाडची पिछाडी

Indian Players ICC T20I Rankings: भारताच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
Yashasvi Jaiswal and Shubman Gill
Yashasvi Jaiswal and Shubman GillSakal
Updated on

ICC T20I Rankings: भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच झिम्बाब्वे विरूद्धच्या टी20 मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या टी20 मालिकेनंतर आयसीसीने बुधवारी (17 जुलै) ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार भारताच्या काही खेळाडूंना फायदा झालाय, तर काही खेळाडूंना नुकसान झाले आहे.

या सामन्यात तीन सामन्यांत 141 धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालने फलंदाजांच्या यादीत चार स्थानांनी झेप घेत सहावा क्रमांका मिळवला आहे. तसेच 5 सामन्यांमध्ये 170 धावा करणाऱ्या गिलनेही 36 स्थानांनी मोठी उडी घेतली आणि 37 वे स्थान मिळवले आहे.

Yashasvi Jaiswal and Shubman Gill
Paris Olympic 2024: ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची अंतिम यादी जाहीर

विशेष म्हणजे तो भारताचा क्रमवारीत चौथा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्यापुढे असणारे सुर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे, यशस्वी जयस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे, तर ऋतुराज गायकवाड आठव्या क्रमांकावर आहे.

गायकवाड यापूर्वी 7 व्या क्रमांकावर होता, मात्र तो सध्या आठव्या क्रमांकावर घसरला आहे. फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ट्रेविस हेड काय आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारताविरुद्ध 6 विकेट्स घेणारा ब्लेसिंग मुझराबनी आता 11 स्थानांनी पुढे येत 44 व्या क्रमांकावर आलाय, तर भारताचा वॉशिंग्टन सुंदर 46 वरून 36 व्या क्रमांकावर आणि मुकेश कुमार 73 व्या क्रमांकावर आले आहेत. त्यांचीही झिम्बाब्वेविरुद्ध चांगली कामगिरी झाली होती.

Yashasvi Jaiswal and Shubman Gill
ICC Ranking : ॠतुराजची टी-२० क्रमवारीत झेप; सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर

गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आदिल राशिद अव्वल क्रमांकावर कायम आहे, तर एन्रिक नॉर्किया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 मध्ये भारताचा एकही खेळाडू नसून भारताचा सर्वोत्तम क्रमवारी असलेला खेळाडू सध्या अक्षर पटेल आहे, तो 13 व्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्याची घसरण झाली आहे. तो पहिल्या क्रमांकाहून थेट सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. आता पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मार्कस स्टॉयनिस, तिसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, चौथ्या क्रमांकावर शाकिब-अल-हसन आणि पाचव्या क्रमांकावर मोहम्मद नबी आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com