ICC Latest Test Rankings: आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) मोठी झेप घेतलीये. जलदगती गोलंदाजाच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये सामील झालाय. सहा स्थानांच्या सुधाणेसह तो 830 प्वॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर विराजमान झालाय. दुसरीकडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) घसरण झालीये. त्याचे स्थान चार क्रमांकानी घसरले असून तो नवव्या स्थानावर आहे. काही दिवसांपूर्वीच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहचलेल्या रविंद्र जडेजालाही फटका बसलाय. तो दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यात जसप्रित बुमराहने घरच्या मैदानावर पहिल्यांदाच पाच विकेट्स मिळवल्या होत्या. बंगळुरुच्या मैदानात त्याने 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. याचा त्याला फायदा झाला आहे. बुमराहने पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी, न्यूझीलंडचा काइल जेमिसन, टिम साउदी, इंग्लंडचा जेम्स अँडरसन, नील वॅगनर आणि जोश हेजलवुड यांना मागे टाकत चौथ्या स्थानावर उडी घेतलीये.
फलंदाजांच्या क्रमवारीत श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने तीन स्थानांनी सुधारणा केलीय. तो आता पाचव्या स्थानावर पोहचलाय. करुणारत्ने याने भारताविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत शतकी खेळी केली होती. त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरली होती. करुणात्नेती कारकिर्दीतील ही बेस्ट रँकिंग आहे. तो आता मार्नस लाबुशेन, जो रूट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विलियमसनसोबत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे.
विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. बंगळुरु कसोटीत त्याने पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात अवघ्या 13 धावा केल्या. या खराब कामगिरीचा त्याला क्रमवारीत फटका बसलाय. तो आता नवव्या स्थानावर पोहचलाय. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जेसन होल्डरने पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केलाय. त्याने रविंद्र जडेजाला खाली खेचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.