Neeraj Chopra : नीरज चोप्राचे Diamond League मध्ये जबरदस्त कमबॅक; केली ऑलिम्पिकपेक्षा भारी कामगिरी

Neeraj Chopra Diamond League 2024 LIVE: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापत असल्याचे संकेत दिले होते, परंतु तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन लोझान डायमंड लीगमध्ये सहभागी झाला.
Neeraj Chopra Diamond League
Neeraj Chopra Diamond Leagueesakal
Updated on

Neeraj Chopra Lausanne Diamond League 2024 LIVE: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हंगामातील सर्वोत्तम ८९.४५ मीटर लांब भाला फेकून नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर आज तो डायमंड लीगमध्ये मैदानावर उतरला आणि पहिल्या तीन प्रयत्नानंतर तो चौथ्या क्रमांकावर घसरला होता. पण, शेवटच्या दोन प्रयत्नात त्याने चांगले पुनरागमन केले आणि बाजी पलटवली. त्याने शेवटच्या दोन प्रयत्नात जबरदस्त खेळ करून दाखवताना हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि ही त्याची ऑलिम्पिकपेक्षा भारी कामगिरी ठरली.

ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकले. नीरजला जेतेपद कायम राखण्यात अपयश आले होते. ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने कांस्यपदकाला गवसणी घातली. अर्शद नदीम डायमंड लीगमध्ये खेळत नसल्याने नीरज आणि अँडरसन यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस पाहायला मिळाली. नीरजने यापूर्वी यंदाच्या हंगामात केवळ दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याला बाकी स्पर्धांमध्ये दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते.

Neeraj Chopra Diamond League
Neeraj Chopra Diamond Leagueesakal

पहिल्या क्रमांकावर भालाफेकीसाठी आलेल्या नीरजला ८२.१० मीटर लांब भाला फेकता आला, तेच अँडरसनने ८६.३६ मीटर आणि ज्युलियन वेबरने ८५.०७ मीटरचे अंतर पहिल्या प्रयत्नात पार केले. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात सुधारणा करताना ८३.२१ मीटर भाला फेक केली, परंतु तो तिसऱ्या स्थानावर राहिला. अँडरसन ( ८८.४९) आणि वेबर ( ८७.०८) हे अव्वल दोन स्थानावर कायम राहिले. नीरज २०२२ मध्ये डायमंड लीगचा विजेता ठरला होता आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता.

शेवटच्या दोन प्रयत्नांसाठी राखून ठेवली ताकद

तिसऱ्या प्रयत्नात नीरजला ८३.१३ मीटर लांब भाला फेकता आला. त्यामुळे युक्रेनचा आर्तर फेल्फनर ८३.३८ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर सरकला. पीटर अन् वेबर ही जोडी अजूनही अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होती. नीरजचा चौथा प्रयत्न ८२.३४ मीटर राहिला. यापूर्वी लोझान येथे झालेल्या दोन्ही डायमंड लीगमध्ये नीरज अव्वल स्थानावर राहिला होता. पाचव्या प्रयत्नात नीरजने ८५.५८ मीटर लांब भाला फेक करून पुनरागम केले आणि तिसऱ्या क्रमांकावर सरकला. अँडरसनने सहाव्या प्रयत्नात ९०.६१ मीटर भाला फेक करून स्पर्धा विक्रम अन् हंगामातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. नीरजने ८९.४९ मीटर भाला फेक करून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

neeraj Chopra
neeraj Chopra esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.