Diamond League: नीरज चोप्रा ऑलिम्पिकनंतर पुन्हा मैदानात, अर्शद नदीम टक्कर द्यायला नाही; कुठे अन् कधी पाहाणार स्पर्धा

Lausanne Diamond League Neeraj Chopra Live Streaming: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर चौदाच दिवसात नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार आहे. तो डायमंड लीगमध्ये आज स्पर्धा खेळणार आहे. त्याची स्पर्धा कुठे आणि कधी पाहू शकता, जाणून घ्या.
Neeraj Chopra | Paris Olympic 2024
Neeraj Chopra | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Lausanne Diamond League Live Streaming: नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक, तर भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं.

तसेच ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने कांस्य पदकाला गवसणी घातली. आता ही पदकं जिंकल्यानंतर अवघ्या १४ दिवसात नीरज आणि अँडरसन पीटर्स पुन्हा मैदानात उतरणार आहेत.

नीरजने यापूर्वीच स्पष्ट केले होते की तो यंदा २२ ऑगस्टला होणाऱ्या लॉझान डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League) सहभागी होणार आहे. त्याने यापूर्वी यंदाच्या हंगामात केवळ दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याला बाकी स्पर्धांमध्ये दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. तरी सध्या तो डायमंड लीगच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024
Neeraj Chopra: नीरजच्या आईने अर्शदला लेक म्हटलंय, आता पाकिस्तानी खेळाडूची आई काय म्हणाली, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.