Commonwealth Games 2022 : भारतीय महिला संघाने लॉन बॉल्समध्ये पहिले वहिले सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. लॉन बॉल्समधील भारतीय संघाचे हे पहिले पदक आहे. यापूर्वी भारताने या खेळात पदक पटकावले नव्हते. मात्र महिला (4) संघाने लॉनबॉलमध्ये पदक पटकावल्यानंतर या खेळाबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. हा खेळ नेमका खेळला कसा जातो (Lawn balls How To Play) त्याचे नियम काय आहेत. आज आपण लॉन बॉलच्या नियमांबद्दल (Lawn balls rules round) जाणून घेणार आहोत.
लॉन बॉल हे गरज पडल्यास तीन फॉरमॅटमध्ये खेळले जाते. या सिंगल्स, डबल्स आणि फोर असे हे ती फॉरमॅट आहेत हे फॉरमॅट किती खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळणार याच्यावर ठरतो.
लॉन बॉल्समधील खेळाडूंना किंवा संघाला 'द जॅक' (एका जागी स्थीर असलेले लक्ष्य) च्या जवळ बॉल प्लेस करायचा असतो. बॉल हा विशिष्ट अंतरावरून आखून दिलेल्या बॉक्सवरूनच प्लेस करायचा असतो. हा बॉल लॉनवरून घरंगळत सोडावा लागतो.
एका संघात चार खेळाडू खेळ असतात त्यावेळी एका संघाला एका एंडमध्ये आठ थ्रो किंवा रोल मिळतात. एक एंड म्हणजे एक फेरी. एका संघाला सामना पूर्ण करण्यासाठी 18 एंड्स पूर्ण करावे लागतात. या फेऱ्या सर्क्युलर पद्धीतीने खेळवण्यात येतात.
ज्या संघाने 18 एंड्स नंतर जास्त गुण घेतलेले असतात त्यांना विजेता घोषित केले जाते. हे गुण संघ प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत किती जास्त बॉल जॅकच्या जवळ प्लेस करतात त्याच्यावर ठरतात.
उदाहरणार्थ : जर अ संघाने ब संघाच्या तुलनेत दोन बॉल जॅकच्या जवळ प्लेस केले तर अ संघाला एंड (फेरी) संपल्यावर दोन गुण मिळतात. जर अ संघ ब संघाने जॅकच्या जवळ प्लेस केलेल्या बॉल्सपेक्षा तीन बॉल जास्त जॅकच्या जवळ प्लेस केले तर त्यांना तीन गुण मिळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.