Commonwealth Games 2022 : लॉन बॉल्स महिला संघाने इतिहास रचला; सुवर्ण पदकाला गवसणी

Gold Medal Winning lawn Ball Indian Women Team Commonwealth Games 2022 At Birmingham
Gold Medal Winning lawn Ball Indian Women Team Commonwealth Games 2022 At Birminghamesakal
Updated on

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला (4) लॉन बॉल्स संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकणारा पहिला भारतीय संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताने 17 - 10 ने सामना जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय लॉन बॉल संघात (lawn Ball Indian Women Team) लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश आहे. रूपा राणी तिर्की ही संघाची कर्णधार आहे. लॉन बॉल्समधील सुवर्ण पदकाबरोबरच भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहचली आहे तर एकूण पदकांची संख्या दुहेरी आकड्याच म्हणजेच 10 वर पोहचली.

Gold Medal Winning lawn Ball Indian Women Team Commonwealth Games 2022 At Birmingham
Commonwealth Games 2022 : तांत्रिक करणामुळे हुकले वेटलिफ्टर पुनमचे पदक

लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका 2 - 2 असा बरोबरीत होती. त्यानंतर भारतीय संघाने 4 - 2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आठव्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 8-4 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने लॉन बॉल्स महिला (4) सुवर्ण पदकाच्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धची 2 - 8 अशी पिछाडी भरून काढत दहाव्या एंडपर्यंत सामना 8 - 8 असा बरोबरीत आणला.

Gold Medal Winning lawn Ball Indian Women Team Commonwealth Games 2022 At Birmingham
Commonwealth Games 2022 Day 5 : भारताच्या पदरात दोन सुवर्ण तर दोन रौप्य

11 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर 10 - 8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 12 व्या एंडनंतर भारताने ही पिछाडी भरून काढत सामना 10 - 10 असा बरोबरीत आणला. भारताने 13 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेवर 12 - 10 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 14 व्या एंडनंतर भारताने ही आघाडी 15 - 10 अशी नेली. यानंतर 15 व्या आणि शेवटच्या एंडमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी अजून दोन गुणांनी वाढवत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()