Happy Birthday Murli Manohar Manjul : क्रिकेट सामन्याचे जसे लाईव्ह प्रक्षेपण महत्वाचे असते तसेच त्याच्या सोबत सुरू असणारी रनिंग कॉमेंटरी देखील तितकीच महत्वाची असते. लाईव्ह सामन्याची दर्जेदार लाईव्ह कॉमेंटरी करणे हे एक कसबच आहे. आजच्या आधुनिक जगतात सामन्याचा प्रत्येक क्षण हा मैदानावरील असंख्य कॅमेरे तुमच्यापुढे काही क्षणात उभा करतात. HD, 4K च्या चश्म्यातून हा सामना पाहणे खूप रंजक असते. मात्र क्षणांच्या चलचित्रात रंग आणि जीव भरतात ते कॉमेंटेटर.
अशाच एका दिग्गज कॉमेंटेटरचा आज वाढदिवस आहे. मात्र हा कामेंटेटर काही आपल्या HD, 4K जमान्यातला स्क्रीन कॉमेंटेटर नाही बर का.. या कॉमेंटेटरने आपल्या दर्जेदार हिंदीने आणि शब्दफेकीने समोर टीव्ही स्क्रीन नसतानाही करोडो क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यासमोर लाईव्ह मॅच उभा केली. या दिग्गज कॉमेंटेटरचं नाव आहे मुरली मनोहर मंजुल!
ज्यावेळी क्रिकेटच्या जगतात टीव्ही नावाचं एक उपकरण यायचं होत. त्यावेळी बीबीसी रेडिओच्या माध्यमातून भारतात क्रिकेटच्या मैदानातील घडामोडी घराघरात पोहचवत होतं. मात्र इंग्रजी माध्यामातील ही रनिंग कॉमेंटरी सामन्य भारतीयांपर्यंत पोहचत नव्हती. हे काम आकाशवाणीच्या माध्यमातून मुरली मनोहर मंजुल यांनी केलं. त्यांच्या ओघवत्या रनिंग कॉमेंटरीने संपूर्ण भारताला रेडिओसमोर खिळवून ठेवलं. इथंच तर भारतातील नव्या क्रिकेट धर्माची पायाभरणी झाली. मुरली मनोहर मंजुल यांनी क्रिकेट रसिकांच्या, श्रोत्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या.
मात्र जसजसा टीव्हीचा विकास होत गेला तसतसे आकाशवाणीवरील कॉमेंटरी अडगळीत जात गेली. याबाबत मंजुल म्हणातात की, 'दूरदर्शन आणि टीव्ही क्रिकेट किंवा खेळांना लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवले आहे. मात्र तुम्हाला हे देखील मान्य करावे लागले की पैसा मिळवण्याच्या बाबतीत असो किंवा खेळाचा प्रसार प्रचार करण्याच्या बाबतीत असो या सर्व लोकप्रीयतेचा पाया हा रेडिओनेच घातला होता. रेडिओने या सर्वांना तयार व्यासपाठ दिले. त्याच्यावर आता हे एवढी मोठी घोडदौड करत आहेत.'
मंजुल यांनी 2004 मध्ये रेडिओ कॉमेंटरलीमधून निवृत्ती घेतली. आकाशवाणीवरून त्यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या प्रकृतीमुळे आपण कॉमेंटरीमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. मंजुल यांनी कपिल देवचे पदार्पण लोकांच्या डोळ्यासमोर उभे केले. आपल्या दमदार आणि प्रभावी वाणीच्या माध्यामातून सुनिल गावसकर यांच्या 10 हजार धावांचा आनंद श्रोत्यांपर्यंत पोहचवला. त्यांच्या 'आखों देखा हाल' या कार्यक्रमाला पुरस्कार देखील मिळाला. त्यांनी 2009 मध्ये 'आकाशवाणी की अंतर्कथा' नावाचे पुस्तक देखील लिहिले. ते चांगलेच प्रसिद्ध झाले.
सरते शेवटी त्यांचे हे शब्द मनाला खूप भावातात.
'ही अतिशयोक्ती नाही. हिंदीची क्रिकेट कॉमेंटरी किचन पासून कमोडपर्यंत पोहचली आहे. आज टीव्ही रेडिओच्या जीवावर क्रिकेट कॉमेंटरीचे व्याज खात आहे. त्यांच्या मागे रेडिओची मुद्दल (कष्ट) लागलेली आहे.'
'मुरली मनोहर मंजुल' तुम्हाला वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.