भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! Hall of Fame मध्ये सामील होणारे पहिलेच आशियाई

Leander Paes and Vijay Amritraj: भारताचे माजी टेनिसपटू लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
Leander Paes and Vijay Amritraj
Leander Paes and Vijay AmritrajSakal
Updated on

Leander Paes and Vijay Amritraj inducted into Tennis Hall of Fame: भारताचा दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेस आणि खेळाडू, टेनिस प्रसारक विजय अमृतराज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पेस आणि विजय अमृतराज यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले आहे.

त्यांना दिग्गज ब्रिटिश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इवान्स यांच्यासह हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले. पेस आणि विजय हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले आहेत.

हॉल ऑफ फेमममध्ये समावेश करताना पेसची ओळख माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने, तर विजय यांची ओळख त्यांचाच मुलगा प्रकाशने करून दिली.

Leander Paes and Vijay Amritraj
ते पत्र अन् आयुष्याला मिळालेली कलाटणी! Wimbledon विजेत्या बार्बोरा क्रेयचीकोव्हाची भावनिक कहाणी

सध्या ७० वर्षांचे असलेले विजय यांनी १९७० ते १९९३ दरम्यान टेनिस खेळले. त्यांनी यादरम्यान एटीपीचे १५ एकेरी विजेतीपदं जिंकली. त्यांनी ३९९ सामने जिंकले होते आणि एकेरीत सर्वोत्तम १८ वा क्रमांकही मिळवलेला.

१९७४ आणि १९८७ साली भारताला डेव्हिस कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचललेला. त्यांनी खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर भारतात एटीपी आणि डब्ल्युटीए स्पर्धांनाही पाठिंबा दिला. त्यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले.

Leander Paes and Vijay Amritraj
Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व! सलग दुसऱ्यांदा जोकोविचला बालेकिल्ल्यात Final मध्ये पराभवाचा धक्का

तसेच ५१ वर्षीय पेसने त्याच्या कारकि‍र्दीत दुहेरीमध्ये तब्बल १८ ग्रँड स्लॅम जिंकले आहे. त्याने १९९६ साली ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा भारताचा पहिला आणि एकमेव टेनिसपटू आहे. तो दुहेरी अव्वल क्रमांकाचा टेनिलपटूही राहिला आहे.

दरम्यान, या सन्मानाबद्दल विजय अमृतराज म्हणाले की हा गौरव केवळ त्यांचा किंवा कुटुंबाचा नाही तर संपूर्ण भारतीयांचा आहे.

तसेच पेसनेही याबाबत आनंद व्यक्त केला आणि देशवासियांचेही आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.