लेजंड क्रिकेट लीग (Legends Cricket League) स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हा इंडिया महाराजा आणि एशिया लायन्स यांच्यात होणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच इंडिया महाराजाला एक धक्का बसला आहे. इंडिया महाराजाचा कर्णधार विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या ऐवजी मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) संघाचे नेतृत्व करणार आहे.
मोहम्मद कैफने मालिका सुरू होण्यापूर्वी सांगितले की, 'विरेंद्र सेहवाग काही वैयक्तिक कारणांमुळे मालिकेचा पहिला सामना खेळू शकणार नाही. तो पुढचे सामने खेळेल. त्याच्या जागी मी इंडिया महाराजा (India Maharajas) संघाचे नेतृत्व करणार आहे.' कैफ पुढे म्हणाला, 'मी देशांतर्गत सामन्यात दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. मी प्रशिक्षक, मेंटॉर आणि समालोचनही केले आहे. मी या खेळाशी अनेक बाबतीत जोडलो गेलो आहे.'
आज इंडिया महाराजा संघाचा पहिला सामना हा एशिया लायन्स बरोबर होणार आहे. एशिया लायन्स संघाचे नेतृत्व मिसबाह - उल - हक करत आहे.
इंडिया महाराजाचा संघ:
मोहम्मद कैफ, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस. बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, मनप्रीत गोनी, हेमंग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया, अमित भंडारी.
आशिया लायन्सचा संघ :
शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चमिंडा वास, रोमेश कालुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझर मेहमूद, उपल थरंगा, मिसबाह - उल - हक, मोहम्मद हाफीझ, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गिल, असगर अफगाण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.