Wrestler Protest Sourav Ganguly : भारताच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणचा आरोप करून त्यांना पदावरून हटवण्याची आणि अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. यावेळी आंदोलनकर्ती कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय क्रिकेटपटू कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल ब्र देखील काढत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. यावर अनेक क्रिकेटपटूंनी पटापट ट्विट केले होते. आता या आंदोलनाबाबत बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपले मत व्यक्त केले. हे मत फारच परखडे होते.
पीटीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत सौरव गांगुली म्हणतो की, 'त्यांना त्यांची लढाई लढू द्या. मला माहिती नाही की तेथे काय होत आहे. मी फक्त वर्तमानपत्रातून बातम्या वाचत आहे. क्रीडा क्षेत्रात मला एक गोष्ट लक्षात आली आहे की ज्या बद्दलचे तुम्हाला पूर्ण ज्ञान नाही त्याबद्दल तुम्ही काही बोलू नये.'
सौरव पुढे म्हणाला की, 'मी आशा करतो की हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा. या कुस्तीपटूंनी खूप पदके जिंकली आहेत. मला आशा आहे की हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल.'
कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतर मंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना बृजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलीसांना एफआयआर दाखल केली असून कुस्तीपटूंना सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकने 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतोय मात्र आंदोलन सुरूच राहणार आहे.' असे वक्तव्य केले होते. ती पुढे म्हणाली की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आमच्यासाठी धक्का नसून. या प्रकरणात जे करायला हवं ते केलं आहे.
हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.