Padma Award : ऑलिम्पिकवीर खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी प्रयत्न करू; खासदार पी. टी. उषा यांचं आश्वासन

१९५२ मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना आजपर्यंत पद्म पुरस्कार दिला गेला नाही.
PT Usha Wrestling Federation
PT Usha Wrestling Federationesakal
Updated on
Summary

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा, राज्यसभा खासदार पी. टी. उषा (P. T. Usha) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने रणजित जाधव यांनी भेट घेतली.

नवेखेड : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी भारताच्या सुवर्णकन्या आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार पी. टी. उषा (P. T. Usha) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने भेट घेतली.

PT Usha Wrestling Federation
कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

१९५२ मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना आजपर्यंत पद्म पुरस्कार दिला गेला नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे (Wrestling Federation) निवेदन देण्यात आले.

PT Usha Wrestling Federation
PT Usha Wrestling Federationesakal
PT Usha Wrestling Federation
जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

पी. टी. उषा यांनी सर्व गोष्टीचा जरूर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ता संग्राम कांबळे, एस. पी. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, उमेश माने, राकेश मोरे, सर्वेश केडिया आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.