शेन वॉर्नच्या आयुष्यातील या घटना कायम स्मरणात राहतील

जागतिक क्रिकेटमध्ये फिरकीपटूंची चर्चा होते त्यावेळी वॉर्नचे नाव घेतले जायचे.
शेन वॉर्न
शेन वॉर्न Sakal
Updated on

Shane Warne : जागतिक क्रिकेटमध्ये फिरकीपटूंची चर्चा होत असेल आणि त्यात शेन वॉर्नचे नाव येत नसेल, तर असे होऊच शकत नाही. शेन वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासारख्या खेळपट्ट्यांवर 708 विकेट घेतल्या असून, काही वेळापूर्वीच या महान फिरकीपटूचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज आपण वॉर्नच्या आयुष्यातील चर्चेतील दहा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. (Shane Warne Life Event Always Be Remembered)

शेन वॉर्न
Shane Warne ने 12 तासांपूर्वीच मित्राला वाहिली होती श्रद्धांजली

1) जन्म ठिकाण आणि पूर्ण नाव

शेन वॉर्नचा जन्म 14 सप्टेंबर 1969 रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात झाला. त्याचे पूर्ण नाव शेन किथ वॉर्न असे होते.

2) आंतरराष्ट्रीय पदार्पण

शेन वॉर्नने 1992 साली भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात अनुभवी रवी शास्त्री आणि तत्कालीन युवा फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी धुव्वादार बॅटिंग केली होती. या सामन्यात वार्नने 150 धावा देत केवळ एकच विकेट घेतली होती.

3) 1993 मध्ये बनवला हा विक्रम

1993 मध्ये वॉर्नने एकूण 71 विकेट घेतल्या होत्या, अशा प्रकारे एखाद्या फिरकी गोलंदाजाने केलेला हा विक्रम त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.

4) 1999 च्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका

शेन वॉर्न 1999 च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत 20 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पुन्हा विश्वविजेते बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

5) 2003 मध्ये पाठवण्यात आले होते घरी

वॉर्न हा क्रिकेटच्या इतिहासातील अशा खेळाडूंपैकी एक होता जो नेहमीच वादांमध्ये घेरलेला असायचा. 2003 च्या विश्वचषकात वैद्यकीय चाचणी दरम्यान, वॉर्नला ड्रग्सचे व्यसन असल्याचे आढळून आले, त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा घरी परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वॉर्नवर ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी 12 महिन्यांची बंदी घातली होती.

शेन वॉर्न
Shane Warne: खेळाडू म्हणून 'ग्रेट' होताच पण माणूस म्हणूनही मोठाच!

6) "बॉल ऑफ द सेंच्युरी"

इंग्लंड विरुद्धच्या ऍशेस दरम्यान षटकातील पहिला चेंडू ज्यावर वॉर्नने इंग्लिश फलंदाज माईक गॅटिंगची विकेट मिळवली होती, टाकण्यात आलेला तो चेंडू खरोखरच चमत्कारिक चेंडू होता.

7) 2011 च्या विश्वचषकासाठी भविष्यवाणी

वॉर्नने 2011 च्या विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी हा सामना अनिर्णित राहील असे भाकीत वॉर्व याने केले होते. विशेष म्हणजे उभय संघांमधील सामन्याचा निकालही अनिर्णित राहिला आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये वॉर्न चर्चेचा विषय ठरला. काही लोकांनी तर वॉर्नने मॅच फिक्स केल्याचेही मत व्यक्त केले होते.

8) पहिले IPL विजेतेपद

IPL ची पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. त्या हंगामात वॉर्न राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत होता. अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत राजस्थान संघाने विजेतेपद पटकावले होते.

9) सलग 2 वर्षे मिळाला पुरस्कार

एक वर्षाच्या बंदीनंतर, वॉर्नने 2004 मध्ये धमाकेदार प्रदर्शन करत "विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर" पुरस्कार जिंकला होता. वॉर्नचा हा ट्रेंड एवढ्यावरच थांबला नाही आणि 2005 मध्ये त्याला पुन्हा या पुरस्काराने गौरवण्यात आले.

10) करिअर रेकॉर्ड

शेन वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 145 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 708 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.