PAK vs NZ : पुन्हा हाईट नो बॉलचा गोंधळ! विराटप्रमाणे मात्र रिझवानला....

PAK vs NZ : पुन्हा हाईट नो बॉलचा गोंधळ! विराटप्रमाणे मात्र रिझवानला....
Updated on

Mohammad Rizwan Hight No Ball Pakistan Vs New Zealand : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 12 मधील सामन्यात शेवटच्या षटकात विराट कोहली फलंदाजी करताना हाईट नो बॉलचा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी अंपायर्सनी नो बॉल देत फ्री हिट दिली होती. यामुळे पाकिस्तानला सामना गमवावा लागला होता. अशीच परिस्थिती पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलमध्ये देखील निर्माण झाली. मात्र तिसऱ्या पंचांनी हा चेंडू वैध ठरवत रिझवानला बाद ठरवले.

PAK vs NZ : पुन्हा हाईट नो बॉलचा गोंधळ! विराटप्रमाणे मात्र रिझवानला....
PAK vs NZ: पाकिस्तान फाइनलमध्ये भारताचा विजय निश्चित! 15 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रिझवान शानदार फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून दिले. पाकिस्तानच्या डावातील सतराव्या षटकात बोल्टने रिझवानला उंच फुल टॉसच्या चेंडूवर रिझवानने झेल केले, तो नो-बॉल असू शकतो, त्यामुळे न्यूझीलंडने नॉन-स्ट्रायकरला त्याला धावबाद केले. मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायर घेतला. नो-बॉल चेक करत थर्ड अंपायरने रिझवानला झेलबाद दिले.

PAK vs NZ : पुन्हा हाईट नो बॉलचा गोंधळ! विराटप्रमाणे मात्र रिझवानला....
New Zealand : न्यूझीलंड नवीन चोकर्स! गतविजेत्यांना लोळवले मात्र पाककडून पराभव

पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा सात विकेट्स राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने 53 आणि केन विल्यमसनने 46 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले. 153 धावांचा पाठलाग करताना बाबर आणि रिझवानच्या जोडीने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. बाबरने 53 आणि रिझवानने 57 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.