Lenon Messi: लिओनेल मेस्सी ‘दस नंबरी’; रोनाल्डोशी बरोबरी

Cristiano Ronaldo: बोलिव्हियाविरुद्धच्या या सामन्यातील तीन गोलांसह त्याने आपल्या आंतररराष्ट्रीय गोलांची संख्या ११२ केली आहे.
Lenon Messi: लिओनेल मेस्सी ‘दस नंबरी’; रोनाल्डोशी बरोबरी
Updated on

Lionel Messi Latest news: पुनरागमन करणाऱ्या लिओनेल मेस्सीने केलेली हॅटट्रिक आणि दोन गोलांसाठी सहाय्य यामुळे अर्जेंटिनाने विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत बोलिव्हियाचा ६-० असा पराभव केला. १० क्रमांकाची जर्सी परिधान करत असलेल्या मेस्सीही ही दहावी आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही दहा हॅटट्रिक केल्या आहेत.

२०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी गत विजेत्या अर्जेंटिनाची पात्रता आता जवळपास निश्चित होत आहे. या पात्रता स्पर्धेतील दहा सामन्यांतून त्यांनी सर्वाधिक २२ गुणांची कमाई करून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलंबियापेक्षा अर्जेंटिना तीन गुणांनी पुढे आहे. कोलंबियाने आपल्या पात्रता सामन्यात चिलीवर ४-० अशी मात केली. त्यांच्याकडून लुईस दियाझ आणि जेम्स रॉड्रिगेझ यांनी गोल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.